विद्युत समस्यांवर लढा: छोटूभाई शेख यांचे नेतृत्वात नागरिकांचे आक्रमक आंदोलन*महावितरणच्या गेट वर बीज बिलाची होळी

*विद्युत समस्यांवर लढा: छोटूभाई शेख यांचे नेतृत्वात नागरिकांचे आक्रमक आंदोलन*

महावितरणच्या गेट वर  बीज बिलाची  होळी 

वरोरा: गेल्या काही महिन्यांपासून वरोरा शहर व तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांना महावितरण कंपनीच्या चुकीच्या व वाढीव विद्युत बिलांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांच्या निवारणासाठी काँग्रेस कामगार कर्मचारी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी सभापती बांधकाम पाणीपुरवठा, वरोरा, शेख जैरुदीन उर्फ छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वात महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले.
छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात, नागरिकांनी त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ठोस भूमिका घेतली. त्यामध्ये चुकीच्या आणि वाढीव विद्युत बिलांची तातडीने दुरुस्ती करणे, वाढलेले युनिट दर कमी करणे, प्रलंबित शेतकरी विद्युत कनेक्शन त्वरित मार्गी लावणे, आणि मीटर रीडिंगमधील त्रुटी दुरुस्त करून योग्य बिलाची आकारणी करणे यांचा समावेश आहे.

वरोरा तालुक्यातील पळसगाव येथील आदिवासी नागरिकांच्या बाबतीत, ४०० ते ५०० रुपयांचे बिल येणे अपेक्षित असताना, १००० ते १६००० रुपयांपर्यंतचे बिल पाठवण्यात आले आहे. या चुकीच्या बिलांची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेख जैरुदीन छोटूभाई यांच्या नेतृत्वात नागरिकांनी महावितरण कंपनीला इशारा दिला आहे की, या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास, तीव्र आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आश्वासन देत, त्यांनी वरोरा तालुक्यातील गोरगरीब नागरिकांचे प्रतिनिधित्व केले आहे.

यावेळी, मोहसीन भाई पठाण, शब्बीर भाई शेख, रघु डडमल, अर्जुन धुर्वे, सुनील कुमरे, अक्षय मडावी, प्रफुल शेडमके, तुडशीदास कन्नाके, महेश धुवे, सोमेश्वर कुडमेथे, विलास आत्राम, मंगेश पेंदाम आदी मान्यवर उपस्थित होते.

महावितरण कंपनीने या मागण्यांचा विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा वरोरा तालुक्यातील नागरिकांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा शेख जैरुदीन उर्फ छोटूभाई शेख यांनी दिला आहे.

महावितरण अभियंत्यांचा सकारात्मक प्रतिसाद
महावितरण कंपनीच्या विद्युत बिलांच्या चुकीच्या आकारणीविरोधात लढा देणाऱ्या नागरिकांच्या मागण्यांना अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले होते. यावेळी, महावितरणच्या अभियंत्यांनी निवेदन बाहेर येऊन स्वीकारले आणि त्वरित मीटर तपासणीसाठी आदेश दिले.या सकारात्मक प्रतिसादामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. छोटूभाई शेख यांच्या ठोस नेतृत्वाखालील या आंदोलनाने विद्युत ग्राहकांचे हक्क अबाधित राहिले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच महावितरणने नागरिकांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे. नागरिकांनी छोटूभाई शेख यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले असून, त्यांच्या प्रभावी कार्यशैलीमुळेच हा संघर्ष यशस्वी झाला आहे

Comments