*भद्रावती येथे 'आपले निसर्ग, पर्यावरण व आपले आरोग्य' यावर जनजागृती कार्यक्रम**इनरव्हील क्लब व इको प्रो यांचा संयुक्त उपक्रम**प्रख्यात पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांची उपस्थिती*

*भद्रावती येथे 'आपले निसर्ग, पर्यावरण व आपले आरोग्य' यावर जनजागृती कार्यक्रम*

*इनरव्हील क्लब व इको प्रो यांचा संयुक्त उपक्रम*

*प्रख्यात पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांची उपस्थिती*

अतुल कोल्हे भद्रावती :- 
               स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर स्थानिक इनरव्हील क्लब व इकोप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लोकमान्य विद्यालयाच्या प्राणांगात आपले निसर्ग पर्यावरण व आपले आरोग्य या विषयावर जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .

या कार्यक्रमाला प्रमुख वकत्ते म्हणून प्रख्यात पर्यावरणवादी मा. बंडू धोत्रे होते .यावेळी उपस्थिताना निसर्ग पर्यावरण व आपले आरोग्य या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी सुद्धा प्रश्न विचारून मानवी जीवनात येत असलेल्या आरोग्य विषयी  समस्यांचे निराकरण कशाप्रकारे करायचेअसे अनेक प्रश्न मांडण्यात आले यावर बंडू धोत्रे यांनी यावर विस्तृत असे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमा पोटदुखे, सूत्रसंचालन सुनिता खंडाळकर , तर उपस्थित त्यांचे आभार जयश्री बलीनवार यांनी मानले .
या कार्यक्रमाला वर्षा धानोरकर, तृप्ती हिरादेवे, केशीनी हटवार, विश्रांती उराडे, शुभांगी बोरकुटे, स्नेहा कावडे, मनीषा ढुमणे, लता टिकरे, रश्मी बिसेन, कविता सुपी ,शेंडे मॅडम आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Comments