*तीन आरोपी अटकेत*
अतुल कोल्हे भद्रावती -
शहरातील मुर्लीधर पाटील गुंडावार लॉन परिसरापासून शाळेत जाणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना दिनांक २१ रोज बुधवार घडली या प्रकरणी दिनांक २२ तारखेला मुलीच्या तक्रारीवरून तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
यातील मुख्य आरोपी सुरज जांबुळे वय २३ वर्ष , विकास ढोक २१ वर्ष, आदर्श धाडसे वय २२ असे आरोपींची नावे आहे . कोलकत्ता त्यानंतर बदलापूर येथील चार वर्षीय मुलीचे अत्याचार प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असताना भद्रावती शहरात १७ वर्षे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारला घडली अल्पवयीन मुलगी व मुख्य आरोपी सुरज एकाच गावचे रहिवासी आहेत अल्पवयीन मुलगी एका खाजगी शाळेत शिक्षण घेत आहे ती नेहमीप्रमाणे शाळेत जाण्याकरता निघाली असता दुचाकी वरती तिघे जण आले व सुरज जांभुळे यानी मुलीला माझ्याशी का बोलत नाही म्हणून तिचा हात पकडला भयभीत झालेल्या मुलीने पळ काढला असता तिचा पाठलाग केला ही घटना मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितली त्यानंतर दिनांक २२ ला भद्रावती पोलिसांनी तक्रार करण्यात आली. यातील तिन्ही आरोपीवर कलम ७४ व ७८ गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम करीत आहे.
Comments
Post a Comment