*शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश डांगे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.*

*शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश डांगे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.* 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा. 

महिला शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. 

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा शहरात शिवसेना शाखा तर्फे गांधी चौक परिसरात रक्षाबंधनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधन निमित्त  युती सरकारने महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा पहिला हप्ता पाठवला आहे. या निमित्य वरोरा शहरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते  यांच्याकडे साखडे घातले होते. परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे प्रत्येक जिल्ह्यातील महिला त्यांना राखी बांधू शकत नाही. मात्र महिला शिवसैनिकांनी प्रत्येक शाखेमध्ये जाऊन शिवसैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. 
याच निमित्ताने वरोरा शहरात गांधी चौक परिसरात जिल्हाप्रमुख नितिन मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा शहर प्रमुख राजेश डांगे यांच्या नेतृत्वात  शेकडो महिलांनी राखी बांधून हा उत्सव साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी लाडक्या बहिणीचे तोंड गोड करत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार व्यक्त केले . महिला सक्षमीकरणाचे काम मुख्यमंत्री महाराष्ट्रात  यशस्वीरित्या पार पाडत आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्याने शिवसैनिकांनी प्रत्येक शाखेमध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण केले असल्याचे मत शहर प्रमुखानी व्यक्त केले. जनतेचे असेच आशीर्वाद राहिले तर सरकार याहीपेक्षा मोठे सहकार्य जनतेला करतील  करतील असा विश्वास व्यक्त करत शिवसेना शहर प्रमुख राजेश डांगे यांनी सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त साड्या साड्या वाटून सण साजरा केला.
या कार्यक्रमासाठी शहर प्रमुख राजेश डांगे यांच्यासह युवा सेना भूषण बुरीले, शाखाप्रमुख महेंद्र बडवाई, रवींद्र कुंमरे , भाजपा सोशल मीडिया प्रमुख  राहुल बांदुरकर , शाखाप्रमुख शोभा रुयारकर, संगीता आडेकर, चंदा मीना, भारती तिवारी , सुमन बुरटकर, निशा रूयारकर. आदी महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Comments