बांगलादेशातील हिंदू वर होणाऱ्या अत्याचारा विरोधात बंद व निषेध मोर्चा

बांगलादेशातील हिंदू वर होणाऱ्या अत्याचारा विरोधात बंद व निषेध मोर्चा :-
 वरोरा :-हरीश केशवानी 
                    बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शहरातील सकल हिंदू समाजा द्वारे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते त्या पार्शवभूमीवर दिनांक 16 ऑगस्ट रोज शुक्रवारला सर्व जातीच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात सहभाग घेऊन अत्याचार विरोधात निषेध मोर्चात सहभाग घेतला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने व शैक्षणिक संस्था पूर्णतः बंद होत्या. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत या बंदचे आव्हान करण्यात आलेले होते.शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने स्वयं स्फूर्तीने बंद ठेवली होती.
                    बांगलादेशात सरकार आणि न्यायव्यवस्था स्थिर नसल्याकारणाने तिथे हिंसक घटनांना वाव मिळत आहे. हिंदूवर अत्याचार शिगेला पोहोचला आहे. हिंदूंची घरे, दुकाने जाळणे आणि मूर्ती तोडणे व मंदिरे तोडणे इत्यादी दृष्कृते त्या ठिकाणी होत आहे. दिवसेंदिवस महिला वरील अत्याचार वाढतच आहे. सत्तांतर झाल्यानंतर तिथे हिंसाचार उफाळला आहे. हिंदू वर होत असलेल्या अत्याचार संबंधी शहरातील सकल हिंदू समाजा तर्फे शिवाजी चौक ते राम मंदिर पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली तसेच नंतर राम मंदिर येथून डोंगरवार चौक,आंबेडकर चौक, शहीद स्मारक चौक ते तहसील कार्यालय पर्यंत शांतीपूर्वक पायदळ रॅली काढण्यात आली. तहसील कार्यालय येथे देशाच्या मा.राष्ट्रपती, मा.प्रधानमंत्री आणि मा.मुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Comments