*महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेचा काळ्या फिती लाऊन निषेध**मानवतेला काळीमा फासणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या*

*महाविकास आघाडीतर्फे बदलापूर घटनेचा काळ्या फिती लाऊन निषेध*

*मानवतेला काळीमा फासणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या*

अतुल कोल्हे भद्रावती :-
               बदलापूर येथील एका शाळेत लहानग्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात भद्रावती शहर तथा तालुका महाविकास आघाडीतर्फे शहरातील गांधी चौकात तोंडाला काळ्या फिती लावून मुक निदर्शने करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील कायदा व सुरक्षितता ढासळल्या प्रकरणी राज्यातील महायुती शासनाचा निषेध करण्यात आला. सदर मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीतर्फे यावेळी करण्यात आली. प्रथम गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण  करून सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. सदर मूकनिदर्शनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुरज गावंडे, तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख,  शिवसेना उबाठा  गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, चंदु दानव, संजय आस्वले,  छोटू धकाते, रितेश वाढइ, भालचंद्र बदखल,सचिन पचारे,शितल गेडाम,लता इंदूरकर, प्रतिभा सोनटक्के, सुनीता खंडाळकर,राहुल सोनटक्के, महेश जीवतोडे, विजय भोयर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Comments