बेलगाव सनफ्लॅग कोल माइन्स च्या ब्लास्टिगं मूळे चंद्रपूर नागपूर नॅशनल हायवे वर पडले खड्डे*

*बेलगाव सनफ्लॅग कोल माइन्स च्या ब्लास्टिगं मूळे चंद्रपूर नागपूर नॅशनल हायवे वर पडले खड्डे*

टेमुर्डा : आज दि.14/08/2024 रोज बुधवार ला सामाजिक कार्यकर्ते समीर देठे यांच्या समय सूचकते मूळे मोठा अपघात टळला.
जाहिरात 
बेलगाव सनफ्लॅग कोल माईन्स हे गेल्या 15 वर्षा पासून  बेलगाव येथे कार्यरत आहे. सनफ्लॅग कोल माईन्स हे टेमुर्डा येथून 5 km अंतरावर आहे. येथे भूमिगत खदान असल्यामुळे  अंडरग्राऊंड ब्लास्टिंग केली जाते, त्या ब्लास्टिगं मूळे आजू बाजूच्या परिसरामध्ये भूकंपाचा धक्का बसण्याची अशी शंका लोकांमध्ये आहे आणी ते आज प्रत्यक्ष्यात झाली आहे .त्यामुळे टेमुर्डा आणी त्या परिसरामधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जर अशी घटना वारनवार घडल्यास काम बंद आंदोलन करू असी अशी माहिती पत्रकाराशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस समीर देठे यांनी  दिली,यावेळी उपस्थित  सचिन भोयर, अनिकेत झिले, केतन देठे, निखिल तिखट, रोशन ठाकूर, तुळशीराम आगलावे, राकेश ठाकूर, भारत झिले आनंद कास्यप, तेजस रेड्डी,ग्यानी हे सर्व उपस्थित होते




Comments