महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ आयोजित 8 व्या राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ आयोजित 8 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात नागपूर येथे आम्ही चंद्रपूर  जिल्ह्यातील 900पोलीस पाटील सहभागी झालो. 2000 वर्षांचा इतिहास असलेल्या .पोलीस पाटील संस्थेचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या पोलीस पाटीलांमध्ये आज आम्ही उपस्थित होतो., याचा विशेष आनंद आहे. ही संस्था जिवंत आणि जागृत ठेवण्याचे काम पोलीस पाटीलांच्या माध्यमातून केले जात आहे. पोलीस पाटील हे देखील आपापल्या गावाचे गृहमंत्री आहेत. गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गावातील कुठल्याही गरिबाला त्रास झाला तर त्रास देणाऱ्या व्यक्तीला शासन झाले पाहिजे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संदेशाचे तंतोतंत पालन पोलीस पाटलांच्या माध्यमातून केले जात आहे. असे उदगार उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काढले.काळाच्या ओघात व्यवस्था बदलली, लोकशाहीत अनेक संस्था तयार झाल्या मात्र 'पोलीस पाटील' या मानाच्या पदाला सन्मान नव्हता. हाच सन्मान प्राप्त करून देण्यासाठी राज्यसरकारने मागील काळात पोलीस पाटलांचे ₹3000 मानधन ₹6500 रुपये केले आणि आता या पदाला ₹15000 मानधन करून पोलीस पाटलांना सन्मान दिला आहे.
     एप्रिल पासून रखडलेले मानधन येत्या काही दिवसात पोलीस पाटीलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आश्वासन साहेबांनी या निमित्ताने दिलेले आहे. सीएमपी प्रणाली द्वारे पोलीस पाटलांचे मानधन दरमहा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आश्वासन हे या ठिकाणी देण्यात आले.
    यावेळी पोलीस पाटील संघटनेकडून केलेल्या मागण्या -
✅पोलीस पाटील पदाचे वय 60 वरून 65 करणे.
✅निवृत्तीनंतर या पदासाठी फुल ना फुलाची पाकळी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.
✅दर 5 वर्षांच्या नूतनीकरण कालावधीत बदल करणे.
✅पोलीस पाटील आणि त्यांच्या परिवारांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
✅कालबद्ध पद्धतीने 100% रिक्त पदे भरणे.
    याबाबत राज्यसरकार सकारात्मक पद्धतीने विचार करेल असे आश्वासन यावेळी सन्माननीय फडणवीस साहेब यांनी दिले. त्यासोबतच पोलीस पाटील रिक्त पदांवर महिलांना प्राधान्य देणार तसेच पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस पाटीलांचा सन्मान करावा यासाठी शासन आदेश काढणार अशी माहितीही दिली.
     यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. परिणय फुके, आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री भुजबळ आणि पोलीस पाटील बांधव उपस्थित होत.
  


Comments