त्या अटी रद्द झाल्याने चंद्रपूरातील बहिण भावाला मिळाला परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ.आ. किशोर जोरगेवार यांचे मानले आभार, दोघांनाही मिळाली फुल फंडेट शिष्यवृत्ती

त्या अटी रद्द झाल्याने चंद्रपूरातील बहिण भावाला मिळाला परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ.
आ. किशोर जोरगेवार यांचे मानले आभार, दोघांनाही मिळाली फुल फंडेट शिष्यवृत्ती
 
चंद्रपूरः एका परिवारातील फक्त एकालाच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या अटीमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात अडथळा येत होता.याच अन्यायकारक अटीच्या विरोधात आवाज उचलत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर अट रद्द करायला लावली, त्याचा लाभ चंद्रपूरातील पवित्रा पोट्टाला आणि शुभम पोट्टाला या बहिण-भावाला झाला असून त्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. या दोघांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार करत आभार मानले आहे.
  पवित्रा आणि शुभम पोट्टाला यांनी त्यांच्या परदेशी शिक्षणाची स्वप्ने पाहिली होती, परंतु एका परिवारातील फक्त एकालाच शिष्यवृत्ती देण्याच्या अटीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला होता. अशा अनेक मुलांनी या अटी विरोधात रोष व्यक्त करत सदर अट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ. जोरगेवार यांनी तात्काळ हे प्रकरण लक्षात घेतले आणि या अटीच्या विरोधात आवाज उठवला. सदर अट रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. यासाठी त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत या अटीविरोधात विद्यार्थांमध्ये असलेल्या रोषाबदल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवगत केले होते. त्यांनंतर ही अट रद्द करण्यात आली आणि आता पवित्रा आणि शुभम पोट्टाला या दोघांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. शिष्यवृत्तीच्या लाभामुळे महाकाली काॅलरी येथील रहिवासी असलेली पवित्रा पोट्टाला ही युके येथील एडिन बर्क येथे एलएलएम चे शिक्षण घेणार आहे तर तिचा भाऊ शुभम हा युएस येथील एल युनिव्हर्सिटी येथे एमइएम चे शिक्षण पूर्ण करणार आहे. पवित्राला 60 लक्ष तर शुभम ला 1 कोटी 30 लक्ष अशी फुल फंडेंट शिष्यवृत्ती मिळली आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या पवित्रा आणि शुभम यांनी आपल्या कुटुंबासह आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे. या भेटीदरम्यान, त्यांनी आ. जोरगेवार यांचा सत्कार केला आणि त्यांच्यामुळेच स्वप्न साकार झाले असल्याचे सांगितले.
  आ. किशोर जोरगेवार यांनी सदर अटीला केलेल्या विरोधामुळे आणि शिष्यवृत्तीच्या नियमांमध्ये बदल घडवून आणल्यामुळे पवित्रा आणि शुभम यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. आ. जोरगेवार यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या प्रगतीला कुठलीही अडचण येऊ नये, हे आमचे उद्दिष्ट आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास मदत होईल. या प्रसंगी पवित्रा आणि शुभम यांच्या कुटुंबीयांनीही आ. जोरगेवार यांचे कौतुक केले आणि त्यांच्या सहकार्याने आपल्या मुलांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील इतर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आशेचा किरण निर्माण झाला आह

बॉक्स 
*शिक्षण शुल्काची मर्यादा रद्द झाल्याने दोंघाना मिळाली फुल्ली फंडेट शिष्यवृत्ती*

नव्या नियमांनुसार शिक्षण शुल्काची मर्यादा 30 ते 40 लाख करण्यात आली होती. सदर अटही आमदार किशोर जोरगेवार यांनी रद्द करायला लावली होती. याचा फायदा पवित्रा आणि शुभम ला झाला असून पवित्राला 60 लक्ष तर शुभमला 1 कोटी 30 लक्ष रुपयांची फुल्ली फंटेड शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Comments