*पवित्र अस्थीधातुंना शेकडो बोद्ध अनुयायांनी केले वंदन* *तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पवित्र अस्थीधातू कलश यात्रा*
*तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पवित्र अस्थीधातू कलश यात्रा*
अतुल कोल्हे भद्रावती :-
श्रीलंका देशातून आलेल्या तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थीधातू आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीधातू कलश महायात्रेचे ऐतिहासिक नगरी भद्रावती येथे आगमन झाले. आम्रपाली सभागृह बाजार वॉर्ड येथे शेकडो बौध्द उपासक उपासिका व अनुयायांनी श्रद्धायुक्त भावनेने पवित्र अस्थीधातुंना वंदन केले. याप्रसंगी श्रीलंकेचे पूज्य भदन्त सुमन रत्न थेरो व भिक्खु संघाने उपस्थितांना धम्म देसना दिली. इंडो एशियन मैत्ता फॉउंडेशन चे सचिव नितीन गजभिये, कोषध्यक्षा स्मिता वाकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भिक्खुनी संबोधी लता राजू देवगडे यांची उपस्थिती होती . प्रास्ताविक धम्मसेवक सिद्धार्थ सुमन यांनी केले. ही कलश महायात्रा दि. 10 सप्टेंबर 24 रोजी पुणे येथून सुरु झाली. अस्थीकलश महायात्रेचे आयोजन इंडो एशियन मेत्ता फॉउंडेशन द्वारा करण्यात आलेले आहे. इंडियन बुद्धिस्ट कल्चरल फॉउंडेशन आणि आम्रपाली महिला मंडळ बाजारवर्ड भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रमिला देवगडे, फर्जना देवगडे, सुवर्णा कोल्हटकर, कल्पना देवगडे, प्रणाली नागदेवते, प्रमिला वारके, सुरेखा रामटेके, रमा वारके, पुष्पा शेंडे, डी. एस. रामटेके, स्वप्नील कोल्हटकर, निखिल रामटेके यांनी मोलाचे सहकार्य केले.
Comments
Post a Comment