आमदार नितेश राणे वर गुन्हा दाखल करा**अल्पसंख्यांक चंद्रपूर शहर राष्ट्रवादी चे पोलीस अधीक्षक ह्यांना निवेदन*
*अल्पसंख्यांक चंद्रपूर शहर राष्ट्रवादी चे पोलीस अधीक्षक ह्यांना निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे नेहमी मुस्लिम समुदायवर काहि न काहि अनुचित विधान करीत असतात.
असेच अहमदनगर येथील एका कार्यक्रमात आपल्या भाषणात मुस्लिम समुदया बद्दल अनुचित विधान केले ह्या विधाना बद्दल मुस्लिम समुदायात असंतोष पसरला आहें. असे विधान केल्या बद्दल समाजात असोंतोष पसरू शकते.
ह्या करिता राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टि ( शरद पवार ) प्रदेश सरचिटनीस मुनाज शेख यांच्या उपस्थीतीत चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू अहेमद इसा ह्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब ह्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आमदार नितेश राणे ह्यांच्या वर गुन्हा दाखल करावे या संदर्भात चर्चा करण्यात आली.
निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अल्पसंख्यांक पक्षाचे इजाज भाई रिझवी, महासचिव मोहन सिंग ठाकूर जलील भाई, अजीम भाई, चांद भाई, बबलू भाई, विश्वास खैरे, जावेद भाई तसेच असंख्य पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment