महारोगी सेवा समिती आनंदवन ( वरोरा ) ने घेतली रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल :*स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात केला सत्कार*

महारोगी सेवा समिती आनंदवन ( वरोरा ) ने घेतली  रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल  :*स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात केला सत्कार* 

   वरोरा 
चेतन लुतडे 


महारोगी सेवा समिती आनंदवन ( वरोरा ) च्या वतीने  शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हा शिवसेना प्रमुख तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक  रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली आहे. दि. १६ सप्टेंबर रोज सोमवारला रात्रो आठ वाजता आनंदवन ( वरोरा ) येथे  स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात स्वरानंदन वाद्यवृंद प्रकल्प आनंदवनचे विश्वस्त तथा मुख्य व्यवस्थापक मा. सदाशिव ताजने यांच्या शुभहस्ते रविंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. ट्रस्टच्या सुयोग्य नियोजनाबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
        शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हा शिवसेना प्रमुख तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी थोर समाजसेवक तथा आनंदवनचे दिपस्तंभ  बाबा आमटे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून महारोगी सेवा समिती आनंदवन ( वरोरा ) चे सचिव मा.डॉ. विकास आमटे यांच्या मार्गदर्शनात  समाज कार्याला सुरुवात केली. सोबतच शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या अंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण ह्या शिकवणीतून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या माध्यमातून विविध योजना व उपक्रम सुरू केले. रविंद्र शिंदे यांनी कोरोना संक्रमण कालावधीत आपल्या मित्रमंडळी व पक्षातील सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या सेवावृत्तीमुळे हजारो रुग्णांना जगण्याची नवी उमेद मिळाली.
    स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल  ट्रस्ट चंद्रपूरच्या माध्यमातून  वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, विदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयक मार्गदर्शन, श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, हिंदू हृदयसम्राट वं. बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, अनाथांची माई स्व. सिंधुताई  सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना आणि कै. म.ना. पावडे ह्या विविध योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर, सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर वाघ, भद्रावती नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, प्रा. प्रिती पोहणे, संजय उमरे व अशोक निखाडे प्रामुख्याने उपस्थित होते. 
-----------------------------------

नेत्रतज्ञ डॉक्टर चेतन खोटेमाटे यांच्या चला बदल घडवूया या कार्यक्रमांतर्गत विठ्ठल कांगणे सर यांना प्रतिमा भेट देताना

Comments