*गुरुदेव सेवा मंडळातर्फे घोडपेठ येथे नंदिबैल सजावट तथा वेशभूषा स्पर्धा*

*गुरुदेव सेवा मंडळातर्फे घोडपेठ येथे नंदिबैल सजावट तथा वेशभूषा स्पर्धा*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 तालुक्यातील घोडपेठ येथे गुरुदेव सेवा मंडळातर्फे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नंदिबैल सजावट तथा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, विजय वानखेडे, अशोक हजारे, पंढरीनाथ बोधे याचेसह गुरुदेव मंडळाचे शंकर खाडे, अनील खडके, चोखोबा मोहितकर, विनोद घुगूल, दिलीप परसुटकर, अशोक येरगुडे, विवेक राऊत, किसन परचाके, संजय लोंढे, शुभम कळसकर, गणेश खाडे, जितेंद्र परचाके, सुनील खडके, प्रफुल माणुसमारे, संदिप खडके, भाऊराव वनकर, मंगला परचाके, बेबी वाटेकर, सुनीता शंखावार, गणेश घोटेकर आदी ऊपस्थीत होते. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील  विजेत्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. बक्षिसांसाठी डा.चेतन कुटेमाटे व रविंद्र शिंदे यांनी आर्थीक सहाय्य केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संजय घुगूल व सरोज गेडाम यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन सुनील खडके यांनी तर आभार अशोक येरगुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावकऱ्यांनी सहकार्य केले.

Comments