चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद.
वरोरा 13/9/2024
चेतन लुतडे
वरोरा शहरातील प्रसिद्ध असलेला कल्पतरू गणेश मंडळाच्या आवारातून दानपेटी चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गांधी चौक येथील गजबजल्या ठिकाणी असणारे कल्पतरू गणेश मंडळ गेल्या कित्येक वर्षापासून सुप्रसिद्ध आहे. वरोरा शहरातील अनेक नागरिक या गणपतीला भेटी देतात. या मंडळापाशी रात्री उशिरापर्यंत बरेच भाविक भेट देऊन जात असतात. भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गणपतीपाशी नवस सुद्धा बोलायला येतात. दर्शन घेताना भाविकांसाठी गर्दी होऊ नये म्हणून दानपेटी मंडळाच्या बाहेर ठेवली होती. भाविकांनी आपल्या मनोभावनेने दानपेटी मध्ये पैसे सुद्धा टाकले होते. दानपेटी काचेची असल्याने आत मध्ये पैसे असल्याचे स्पष्ट दिसत होते.लगभग 2 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाने आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत दानपेटी घेऊन रफूचक्कर झाला. मंडळाच्या पाठीमागे जाऊन ही दानपेटी फोडली व त्यातील पैसे काढून कामगार चौकातून पुढे पळाला. मंडळात बसून असलेले कल्पतरू गणेश मंडळाचे अध्यक्ष चेतन शर्मा व सदस्यांना माहीती होताच या चोराचा तपास करण्यासाठी चारही दिशांनी मित्रमंडळी फिरली. दहा मिनिटात या चोरट्याला पकडण्यात यश आले. तोपर्यंत या चोरट्याची चांगली धुलाई करण्यात आली. मात्र हा व्यक्ती चांगलाच कट्टर निघाला चोरलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा मात्र कुठे आहे हे शेवटपर्यंत सांगितले नाही. मंडळातील लोकांनी विचारण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच सांगितले नाही. काही पैसे खिशात असल्याने मंडळांच्या सदस्यांना ते मिळाले.
यानंतर वरोरा पोलिसांना कळविण्यात आले लगेच पोलीसांनी त्याची माहिती गोळा केली. या चोरट्यांचे छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बि एन सी कलम 304,324 दाखल केली असून आरोपी प्रशांत वाकुडकर राहणार खांबाडा याच्याकडून दानपेटीतून चोरीला गेलेले 6000 रुपये ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीसोबत अजून कोणी आहेत का याचा तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांम्हडे यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलीस करित आहे.
Comments
Post a Comment