शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सिंदखेड राजा येथे सूरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा**तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन*
*शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सिंदखेड राजा येथे सूरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाठिंबा*
*तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे दि. ०६ सप्टेंबर पासून शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत. या अन्नत्याग आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आज (दि.६) ला भद्रावतीचे तहसीलदार खांडरे यांना निवेदन देण्यात आले.
सदर आंदोलनाच्या माध्यमातून कोणतीही अट न लावता सरसकट पिकविमा मिळाला पाहिजे, सोयाबिन, कापसाची दरवाढ झाली पाहिजे, अतिवृष्टीची मदत तात्काळ मिळाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहीजे, आदी मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्या व आंदोलनाला निवेदनातून पाठिंबा दिला आहे.
या मागण्या रास्त असून शेतक-यांच्या हिताच्या आहेत, तरी शासनाने वरील मागण्या मान्य करून शेतक-यांना न्याय दयावा, जर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन सर्वस्वी जबाबदार राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना कोंढा येथील युवा शेतकरीपुत्र बंटी थेरे, शैलेश गोंडे, प्रदिप डोंगे, विवेक मत्ते, नंदू गोंडे, कृष्णा थेरे, चंदन नागपुरे, रुपेश मत्त्ते, नरेन्द्र नागपुरे, विनोद चिकटे, योगेश दुधलकर, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment