*काव्यपठन स्पर्धेत फेरीलैंड कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा वानखेडे नागपूर विभागातून प्रथम*
*काव्यपठन स्पर्धेत फेरीलैंड कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा वानखेडे नागपूर विभागातून प्रथम*
अतुल कोल्हे भद्रावती :-
कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्याच्या नागपूर विभागातर्फे नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पल्लवन तथा काव्यपठण स्पर्धेत भद्रावती शहरातील फेरीलँड कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी समीक्षा वानखेडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सदर स्पर्धेत महाविद्यालयाच्या 27 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. याशिवाय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल महाविद्यालयातील हिंदीच्या प्राध्यापिका कविता पाझारे यांना नागपूर येथे मुंबई येथील हिंदी सुप्रसिध्द साहित्यकार डॉक्टर दयानंद तिवारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल या सर्वांचा महाविद्यालयात महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फेरीलैंड कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक अड. युवराज धानोरकर, प्राचार्या वर्षा धानोरकर, उपप्राचार्या अर्चना धोटे, अधिक्षिका कुमुद पोइनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment