*सांकेतिक भाषा दिनानिमित्त " ओळख कर्णबधिरांच्या भाषा विश्वाची" कार्यक्रमाचे आयोजन**रोटरी क्लब वरोरा व आनंदवन मित्र मंडळाचा संयुक्त उपक्रम*
*रोटरी क्लब वरोरा व आनंदवन मित्र मंडळाचा संयुक्त उपक्रम*
फक्त बातमी
*वरोरा* : सांकेतिक भाषेची जागरूकता वाढविणे तसेच सांकेतिक भाषेचा दर्जा मजबूत करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब वरोरा व आनंदवन मित्र मंडळ, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महारोगी सेवा समिती संचालित संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा निजबल शिक्षा निकेतन, आनंदवनच्या सहकार्याने येथील हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सांकेतिक भाषा दिनानिमित्त " ओळख कर्णबधिरांच्या भाषा विश्वाची" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, न.प. कर्मचारी गण,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींना सांकेतिक भाषेतील वर्णमाला, अंक वाचन, कुटुंब व नाती संबध, शुभेच्छा, वेळ - काळ त्याच बरोबर दैनंदिन जीवनात उपयोगी असलेल्या महत्वाच्या सांकेतिक निर्देशांचे प्रात्यक्षिके करून दाखविले.
प्रथम व द्वितीय सत्राचे अध्यक्षस्थान क्रमशः हिरालाल लोया विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक महेश डोंगरे व नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक किरण झिलपे यांनी भूषविले. यावेळी मंचावर ज्येष्ठ नागरिक संघटना, वरोरा सचिव मारोतराव मगरे, आनंदम् मैत्री संघाच्या राज्य समन्वयक संगीता गोल्हर, रोटरी क्लब, वरोरा अध्यक्ष बंडू देऊळकर, सचिव अभिजित मणियार, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, सचिव राजेंद्र मर्दाने, संधी निकेतन अपंगांची कर्मशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, प्रकल्प समन्वयक अश्विनी आंधळकर, हिरालाल लोया विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पवार सर, सालवटकर सर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डोंगरे म्हणाले की, संयुक्त राष्ट्राने २३ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून जाहीर केला आहे. कर्णबधिर दिव्यांगजनाच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी सांकेतिक भाषा महत्त्वाची ठरते.
कार्यक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद करताना बंडू देऊळकर म्हणाले की, सांकेतिक भाषेबद्दल सकारात्मकता निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब वरोरा व आनंद मित्र मंडळ वरोरा तर्फे अधिकाधिक शाळा, सेवाभावी स्वंयसेवी संस्था, शासकीय कार्यालय, शिक्षक, कर्मचारी, कामगार, नेते मंडळी , महिला - पुरुष इत्यादींना सांकेतिक भाषा सप्ताह निमित्त एकत्रित आणण्याचा सर्व शक्य प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे.
नलगिंटवार म्हणाले की, दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवडा हा सांकेतिक भाषा सप्ताह व वर्ष २०१८ पासून २३ सप्टेंबर हा दिवस रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक दिवस साजरा करण्यात येतो. त्या मागील कारण म्हणजे १९५१ सालच्या २३ सप्टेंबर या दिवशी जागतिक फेडरेशन ऑफ द डेफ ( डब्ल्यूएफपी) ची स्थापना करण्यात आली होती. या दिवसाचा मुख्य उद्देश सांकेतिक भाषेचा अधिकाधिक प्रचार प्रसार करणे आणि लोकांना या भाषेप्रति जागरूकता वाढविणे आहे. डॉ. विकास आमटे यांच्या मार्गदर्शनात गेली ५० वर्ष संधी निकेतन दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करीत आहेत. त्यात निजबल- शिक्षा निकेतन प्रकल्पाने शिक्षण व व्यवसाय प्रशिक्षणाची एकत्र सांगड घालत दिव्यांगा करता नवीन दालन उभे केले आहे. जागतिक सांकेतिक भाषा दिनानिमित्त स्वतः कर्णबधिर त्याची सांकेतिक भाषा शिकवायला आपल्या पर्यंत आलेत. कर्णबधिर इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यांच्यात श्रवणदोष असलातरी ते सामान्यापेक्षा कौशल्यात निश्चितच वरचढ आहेत. समाजाने त्यांना सामावून घेतल्यास त्यांचा न्यूनगंड दूर होण्यास हातभार लागेल. त्या दृष्टीने त्यांचे सांकेतिक भाषा समजून घेण्याची व त्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.
राजेंद्र मर्दाने यांनी सांकेतिक भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, पहिले गोंधळ, डंडार या माध्यमातून बहुरुपी समाज हाताच्या खाणा- खुणा करीत. त्याच्या रोजच्या व्यवहारात " करपल्लवी " या सांकेतिक भाषेचा उपयोग होत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या करपल्लवी भाषेचा महती जाणून घेऊन त्याचा उपयोग आपले गुप्तहेर खाते अधिक सक्षम, मजबूत करण्यासाठी केला होता. त्यासाठी सांकेतिक भाषेत निपूण व्यक्तिमत्व असलेल्या बहिरजी नाईक यांना महाराजांनी गुप्तहेर खात्याचे प्रमुख बनवले होते.
यावेळी नगरपरिषद सेवेतील दिव्यांग कर्मचारी पंकज लाकडे यांनी काम करीत असताना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, आलेले अनुभव आपल्या सांकेतिक भाषेत व्यक्त केले.
डॉ. मुधोळकर यांनी सांकेतिक भाषेचे महत्त्व सांगत समाजकार्यात आनंदवन मित्र मंडळाची भूमिका विशद केली.
न.प.चे कर विभाग प्रमुख रवींद्र गड्डमवार, जेष्ठ रोटेरियन अमित लाहोटी यांनी आपले विचार मांडले.
सुरवातीला मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. व त्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात संधी निकेतन अपंगाची कर्मशाळेचे विशेष शिक्षक सौरव वानखेडे, मदतनीस मुकेश पिपरे, विद्यार्थी अमन गायकवाड आयुष्य चेन्नुरवार, शंतनु सोनवणे, अल्फिया तवर, पल्लवी मेटे, राजनंदनी वाभिटकर, रोटरीचे माजी अध्यक्ष हिरालाल बघेले, रोटरियन अमित लाहोटी, दामोदर भासपाले,योगेश डोंगरवार ,शब्बीर भाई,अभिजीत बोथले,विजय पावडे. नगरपरिषद विभाग प्रमुख रवींद्र गड्डमवार , नगर रचनाकार विभागाच्या ऐश्वर्या तरडे, गजानन आत्राम, रोहित खोब्रागडे, भारत पातालबंशी, प्रकाश नकवे, घनश्याम तिवारी, सुजीत वाटकर, भूषण सालवटकर, आनंदवन मित्र मंडळाचे पदाधिकारी सुनंदा पिदुरकर, विजय वैद्य, विवेक बर्वे भास्कर गोल्हर, खेमचंद नेरकर, विकी पाटील, ओकेश्वर टिपले आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मर्दाने यांनी तर आभार अभिजित मणियार यांनी मानले.
कार्यक्रमाचा समारोप सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला.
कार्यक्रमात हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, नगरपरिषद नेहरू उर्दू शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, न. प. कर्मचारी वृंद, रोटरियन, आनंदवन मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment