फक्त बातमी
चेतन लुतडे
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने व माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे मार्गदर्शनात तसेच किशोरजी राय संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा यांचे सूचनेनुसार आज बैलपोळ्या निमित्त श्री नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी गौराळा येथील गणेश मंदिरा मधील पोळा उत्सवात सहभाग घेऊन बैल जोडी मालकांना एक छोटीशी भेट म्हणून टिफिन डब्बा गिफ्ट केला व सर्व बैल जोडी मालकांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सदैव आपल्या पाठीशी उभे आहे अशी ग्वाही देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले .
सर्व शेतकरी बांधवांनी नितीन भाऊ यांचे अभिनंदन करून त्यांना पण बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन धोरण आखले असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार असल्याचे मत यावेळ व्यक्त केले.
युवा प्रशिक्षण योजना, लाडका भाऊ योजना, वयोवृद्ध योजना, अशा अनेक योजना मार्फत सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्की दिलासा देणार अशी हमी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मध्ये यांच्यासह आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रपूर, श्री मनीष बुच्चे उपशहर प्रमुख भद्रावती, श्री प्रथम गेडाम शाखाप्रमुख गवराळा, श्री राकेश बदखल, प्रतीक वरखडे, श्रीनिवास जीवतोडे, निलेश टोंगे, सुरज ढवळे, रोशन बदखल, अक्षय आस्कर, राज बदखल, ओमकार बदखल व सर्व शिवसैनिक, सर्व बैलजोडी मालक, तसेच सर्व गौराळा येथिल नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment