*मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरीताई पेंडणेकर, महिला आघाडीच्या उपनेत्या विशाखाताई राऊत यांच्यासह मान्यवर महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*
चंद्रपूर (भद्रावती) :
दि. १९ सप्टेंबर २०२४ रोज गुरुवारला सकाळी ११ वाजता भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे, शिवसेनेचे जेष्ठ नेते भास्कर जाधव साहेब यांच्या आदेशान्वये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची वरोरा-भद्रावती विधानसभा आढावा सभा आयोजित करण्यात आलेली आहे.
या सभेत प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरीताई पेंडणेकर, राज्य महिला आघाडीच्या उपनेत्या विशाखाताई राऊत, चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सुषमाताई साबळे, संपर्क संघटिका सोनालीताई म्हात्रे, पक्ष निरीक्षक शालिनीताई सावंत आणि निधीताई शिंदे, नागपूर जिल्हा संपर्क संघटिका मंदाकिनीताई भावे आणि पुर्व विदर्भ युवा सेना सचिव तथा सिनेट सदस्य गोडवाना विद्यापीठ गडचिरोली प्रा. निलेश बेलखेडे उपस्थित राहतील. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र) यांची प्रमुख उपस्थिती राहतील.
सदर आढावा सभेला ७५-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील समस्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुरुष व महिला आघाडी आणि युवा सेनेचे समस्त शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू भगिनींनी फार मोठ्या संखेत उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे संयुक्त आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र), महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा संघटिका नर्मदाताई बोरेकर, उप-जिल्हा संघटीका मायाताई नारळे, भद्रावती तालुका संघटिका आशाताई ताजने, वरोरा तालुका संघटिका सरलाताई मालोकर, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती अश्लेषा जीवतोडे भोयर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका कल्पनाताई टोंगे, भद्रावती शहर सघंटीका मायाताई टेकाम, वरोरा शहर सघंटीका शुभांगी अहीरकर, भद्रावती शहर समन्वयक भावनाताई खोब्रागडे, वर्षाताई ठाकरे व प्रा. प्रिती पोहाने तसेच चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment