गणेशोत्सव, ईद ए मिलाद निमित्य भद्रावती पोलिसांनी काढला रूट मार्च*

*गणेशोत्सव, ईद ए मिलाद निमित्य भद्रावती पोलिसांनी काढला रूट मार्च*

अतुल कोल्हे भद्रावती :-
           दि. ७ सप्टें ला गणेशोत्सव उत्सवाला सुरवात झाली, आणि १६ सप्टेंबर ला मुस्लिम बांधवाचा ईद ए मिलाद हा सन असून शहरात शांतता सुव्यस्था  प्रस्थापित व्हावी करिता गणेशोत्सव, ईद ए मिलाद हे उत्सव शांतपणे पार पडावे या दृष्टीने दि. ९ सप्टेंबर ला भद्रावती पोलिसांनी रूट मार्च चे आयोजन केले.
हा रूट मार्च भद्रावती शहराच्या मुख्य मार्गाने बालासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते  जंगल नाका, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, जामा मस्जिद, गाँधी चौक, नाग मंदीर या  मार्गाने काढण्यात आला.

सदर रूट मार्च जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने अप्पर पोलीस अधिक्षक  श्रीमती रीना जनबंधु,  उप विभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांचे मार्गदर्शनात काढण्यात आला. या रूट मार्च मधे पोलीस निरीक्षक बिपिन इंगले, ८ अधिकारी पो स्टे भद्रावती, राज्य राखीव पोलीस बळ, भारत राखीव बटालियन चे कर्मचारी, होमगार्ड सैनिक ८ असे एकूण ८ अधिकारी आणि ११९ कर्मचारी सहभागी होते. 

शहरात शांतता सुव्यस्था  प्रस्थापित व्हावी आणि आगामी होणारे सन् उत्सव  शांततेत पार् पडावे यासाठी बंदोबस्त करण्या करिता भद्रावती पोलीस हे नेहमी सज्ज आहे.

Comments