विलास नेरकर यांची राट्रीय कुणबी महासंघाच्या महासचिव पदी नियुक्तिकुनबी समाजातील पोटजाती एकत्रीत येणे काळाची गरज - माजी खासदार मधुकर कुकडे
कुनबी समाजातील पोटजाती एकत्रीत येणे काळाची गरज - माजी खासदार मधुकर कुकडे
चंद्रपूर
चेतन लुतडे
या देशामध्ये कुणी समाजाची संख्या ४० टक्के मोठ्या प्रमाणात आहे परंतु हा सामाजे पोटजातीमध्ये विखुरला असल्यामुळे स्वातंचाच्या ७५ वर्षानंतरही अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. शासन प्रशासनामध्ये कुणबी समाजाला नगन्य प्रतिनिधीत्व मिळालं आहे.आणि म्हणून त्यामूळे कुणबी समाजातील पोटजातीनी एकत्रीत येणे काळाची गरज आहे. असे विचार राष्ट्रीय कुनबी महासंघाच्या वतीने आयोजित चंद्रपूर येथील हॉटेल राजवाडा मध्ये संपन्न झालेल्या मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलताना गोंदिया भंडारा जिल्ह्याचे माजी खासदार मधुकरराव कुकडे यांनी असे विचार व्यक्त केले.यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे
अध्यक्ष प्रसिद्ध पत्रकार दलितमित्र व आदिवासी सेवक डी.के.आरिकर हे होते . त्यांनी कुणबी समाजाची जातीय जनगणना झाली पाहिजे व लोकसंख्येचा प्रमाणात ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत आणि शिपयापासुन तर सुप्रीम कोर्टापर्यत प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे अशी भूमिका विषद केली.लवकरच दिल्ली येथे राष्ट्रीय कुणबी महासंघाचे केंद्रिय कार्यालय सुरू होणार असल्याचंही डी.के.आरीकर यांनी संगीतले. यावेळी मंचावर मधुकर राव कुकडे, डी.के.आरिकर, राष्ट्रिय कुणबी महासंघाचे उपाध्यक्ष प्रो.शेषराव येलेकर, बळवंत भोयर, प्रवक्ते राजुभाऊ राऊत, सचिव रमेश बोरकुटे महिला विंग प्रदेश अध्यक्षा रिनाताई पाडे,मुंबई ॲड.संजय ठाकरे,गडचिरोली धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अँड.पुरुषोत्तम सातपुते, सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष अँड. हिराचंद बोरकुटे ,भुमीपुत्र ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. अभिलाशा गावतुरे , वैशाली रोहणकर वर्षा कोठेकर,आशीष येडांगे , संदीप तलगे,पी. एस.आरीकर, सुधाकर काकडे, उमाकांत थाडे होते.
सर्वप्रथम जगत गुरू संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज व क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमांना पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात होण्या आधी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु दिवंगत डॉ.सुभाष चौधरी यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कुणबी बांधव उपस्थित होते.
याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या पदाधिकारी यांना पाहुण्यांचा हस्ते नियुक्ती पत्र देन्यात आले.
या कार्यक्रमाला विदर्भातून पाहुल्यांच्या हस्ते नियुकी पत्र दल्यात आले. लवकरच नागपूर येथे राष्ट्रिय कुणबी महासंघाचे भव्य अधिवेशन घेण्याचे ठरले.
या कार्यक्रमाला विदर्भातून अनेक पदाधिकारी आले होते.
यांमध्ये प्रामुख्याने नागपूर येथुन प्रदिप महाजन, टेमराज माले, रामरतन देशमुख, पुंडलिक ठाकरे, प्रकाश काळबांधे, वर्धेवरून विनोद सातपुते, युवा अध्यक्ष स्वप्नील लोणकर,सचिन तूरनकर, महेन्द्र शिरोडे, यवतमाळ वरून संदीप तेलंगे, विनोद दोंदल, प्रकाश खुडसंगे, वरोऱ्यातून विलास नेरकर, चंद्रकांत कुंभारे,शरद जिवतोडे, रवि भोयर, मुलवरून राज ठाकरे,पंकज कोहळे,संतोष चितारे,पंकज लाडवे,संदिप मोरे तर सावली वरून बालाजी भोयर, बल्लारपूर येथून सुधिर कोरडे ,राजेश बटे याची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रिय कुणबी महासंघाचे सचिव रमेश बोरकुटे,जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे, संजय फाले, दिक्षा कष्टी,उर्मीला बोबडे , पानघाटे ,अनिल फाले,आशीष येडांगे यानी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment