सयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेगाव ( बु.) याच्या कंपनीच्या परिसरात वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न.

सयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेगाव ( बु.) याच्या कंपनीच्या परिसरात वृक्षरोपण  कार्यक्रम संपन्न.

वरोरा 
चेतन लुतडे 

शेगाव ( बु ) येथे दिनांक ०६ - ०९ - २०२४ ला रिझर्व बँक ऑफ इंडिया, नागपूर. व जिल्हा अमलबजावणी कक्ष, स्मार्ट प्रकल्प चंद्रपूर. आणि सयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेगाव ( बु.) यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीच्या आवारामध्ये वृक्षरोपण करण्यात आले. 
  याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय अरविंदजी नायर ( रिझर्व बँक ऑफ इंडिया, व्यवस्थापक नागपूर) यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बँकेचे व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि ऑनलाईन आपली फसवणूक कशी होते व फसवणूक झाल्यावर त्यासाठी आपल्याला काय करायचे याबाबत नायर सर यांनी सविस्तर अशी माहिती दिली. तसेच नंदकुमार घोडमारे (नोडल अधिकारी, स्मार्ट प्रकल्प चंद्रपूर.) यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच सयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेगाव यांनी नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता शुद्ध जवस तेल व शुद्ध फल्लीतील तसेच नारळाचे शुद्ध तेल नागरिकांना कसे खायला मिळेल हा विचार त्यांनी लक्षात घेऊन चांगल्या प्रकल्पाची सुरुवात केली. त्यासाठी उपस्थित मान्यवरांनी कंपनीचे आभार मानून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच श्री विशाल घागी (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वरोरा) यांनी सुद्धा आत्मा अंतर्गत येणाऱ्या विविध योजने विषयी माहिती दिली. 
   सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कंपनीचे विनोद राऊत (चेअरमन), रवींद्र साखरकर ( सेक्रेटरी), सोयाबीनचे संशोधक तसेच कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश गरमडे, डायरेक्टर विकास हजारे , विनोद मारोती कोटकर यांनी अथक परिश्रम घेतले या वृक्षारोपण कार्यक्रमाला कंपनीचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Comments