वरोरा शहर कमिटीच्या पुढाकाराने विश्वाला अमन व शांतीचे संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात आली.
वरोरा
चेतन लुतडे
वरोरा : जश्ने ईद-मिलादुन्नबी शहर कमिटीच्या वतीने
संपूर्ण विश्वाला अमन व शांतीचे संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शहरातील सर्व मुस्लीम समुदायच्या उपस्तिथित मंगळवारी दि. १६/०९/२०२४ ला मोठ्या जल्लोषात जयंती मिरवणूक काढली. यात आकर्षक झांकी प्रमुख आकर्षण ठरल्या. विशेषत: लहान लहान मुलांनी जुलूसाची शोभा वाढवली. जुलूसला शहरभर विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.
मुस्लिम समाजाने शहरात पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य जुलूस काढला. मालवीय वॉर्ड, मौलाना आझाद वॉर्ड, कालरी वॉर्ड, कासम पंजा, काजी मोहल्ला परिसरातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जहीरुद्दीन चिश्ती दरगाह परिसरात एकत्र आले. त्यानंतर येथून जुलूस सुरू होऊन सदभावना चौक, माढेली नाका, जयभारतीय चौक, डोंगरवार चौक, मित्र चौक, आझाद वॉर्ड, कालरी वॉर्ड, साप्ताहिक मंडी, नेहरू चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप झाला.
जुलूस दरम्यान शहरातील विविध राजकीय व सामाजीक संघटना आणि संस्थांनी तसेच लक्ष्मणरावजी गमे (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ) व खासदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा कॉंग्रेस कमेटी, मुकेश्भाऊ जीवतोडे शिवसेना जिल्हा प्रमुख, अनिलभाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष भद्रावती या सर्व मान्यवरांनी शाल पुष्प गुच्छ देऊन मौलाना व कमेटीच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून सर्व नागरिकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. सामाजिक संघटनांनी शरबत, मिठाई आणि लंगरची व्यवस्था केली होती.
त्यावेळी शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासनाचे पथक तैनात होते.
पोलिस प्रशासन आणि वरोरातील नागरिकांचे जश्न-ए-ईद-मिलाद-उन-नबी शहर कमिटीने धन्यवाद दिले, ज्यांनी या जुलूसाला यशस्वी बनवण्यासाठी मदत केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये जश्न-ए-ईद-मिलाद-उन-नबी शहर कमिटीचे शब्बीर शेख, मोहसिन रजा पठान, जावेद हबीब, शेख, शकील खान, इमरान शेख, शाहरुख शेख, छोटू भाई, जावेद अंसारी, जावेद रजा, अनिस शेख, अयूब खान, मम्मू भाई बशीर भाई ( अन्ना ), नसीम कादरी, काजी मोहल्ला कमिटी, मौलाना आझाद वॉर्ड कमिटी, कासम पंजा कमिटी, कालरी वॉर्ड, मालवीय वॉर्ड कमिटी, कच्छी मस्जिद कमेटी सर्वांच्या सहकार्याने हजारो समाज बांधवांच्या सदर कार्यक्रम शांततेत पार पडला .
कमिटीचे पदाधिकारी :
शब्बीर शेख
मोहसिन रजा पठान
जावेद हबीब शेख
शकील खान
इमरान शेख
शाहरुख शेख
जावेद अंसारी
जावेद रजा
अयूब खान
शेख हमीद (मम्मू भाई)
या कार्यक्रमाचे आयोजन वरोरा मधील जश्ने ईद-मिलादुन्नबीचे वरोरा शहर कमिटीचे शब्बीर शेख
मोहसिन रजा पठान,जावेद हबीब शेख,शकील खान
,इमरान शेख,शाहरुख शेख,जावेद अंसारी,जावेद, रजाशेख हमीद (मम्मू भाई) यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
Comments
Post a Comment