लंडनच्या सॉस युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल यांची ऐतिहासिक नगरी भद्रावतीला भेट* *जैन श्वेतांबर मंडळ भद्रावतीच्या वतीने प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल यांचा सत्कार*

*लंडनच्या सॉस युनिव्हर्सिटीचे  प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल यांची ऐतिहासिक नगरी भद्रावतीला भेट* 

*जैन श्वेतांबर मंडळ भद्रावतीच्या वतीने प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल यांचा सत्कार*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                  लंडनच्या सॉस युनिव्हर्सिटीचे  प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल यांनी  ऐतिहासिक नगरी भद्रावतीला दि. ९ व  १० सप्टेंबर रोजी भेट दिली.  प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल सर जगातील विविध  देशांना भेटी देवून  त्या - त्या देशातील धार्मीक स्थळांची माहिती संग्रहीत करीत आहे. त्यांनी भद्रावती शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली. तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे  चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक रविंद्रभाऊ  शिंदे यांच्या निवासस्थानी सुध्दा सदिच्छा भेट देवून त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. रविंद्रभाऊ  शिंदे यांनी ट्रस्टच्या वतीने प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल सर यांचे स्वागत केले. याप्रसंगी प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल सर यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी ट्रस्टचे संस्थापक रविंद्रभाऊ शिंदे व ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले सर प्रामुख्याने उपस्थित होते.
      तसेच  जैन श्वेतांबर मंडळ भद्रावतीच्या वतीने प्रोफेसर डॉ. पीटर फ्लूगेल सर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जैन श्वेतांबर मंडळाचे उपाध्यक्ष राजेन्द्रजी गोलेच्छा, प्रा. धनराज आस्वले सर, प्रकाशचंद्र कोठारी, व्यवस्थापक भिकमचंदजी बोरा, सहव्यवस्थापक संतोषकुमार तातेड,पोमेश्वर टोंगे  व अशोक निखाडे प्रामुख्याने उपस्थित होते.



Comments