जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या पुढाकारातुन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, ‘शिवालय’ येथे गौराई माझी लाडाची गं…..कार्यक्रम संपन्न*

*जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या पुढाकारातुन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, ‘शिवालय’ येथे गौराई माझी लाडाची गं…..कार्यक्रम संपन्न*

वरोरा 
चेतन लुतडे 
महाराष्ट्रातील स्त्रीया जेष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पुजा करतात. गौरीपुजन वा महालक्ष्मी पुजन हे हिंदु सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्वाचे व्रत आहे, त्याचे पालन व्हावे, सर्व महिलांनी एकत्र यावे, चांगल्या विचाराचे आदानप्रदान व्हावे या करीता वरोरा -भद्रावती व राजुरा विधानसभा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय, *‘शिवालय’ येथे गौराई माझी लाडाची गं….. कार्यक्रम  मोठ्या उत्साहात साजरा झाला.

  चंद्रपूर जिल्हा संघटीका सौ.नर्मदाताई बोरेकर, भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती तथा युवतीसेना  महासचिव सौ.अकलेषा जिवतोडे (भोयर) याच्या पुढाकारातुन  व वरोरा तालुका सघंटीका सौ सरला मालोकर, भद्रावती तालुका सघंटीका सौ आशाताई ताजने, कु. प्रतिभा माडंवकर जिल्हा युवती अधिकारी,भद्रावती उपशहर संघटीका सौ शिलाताई आगलावे,भद्रावती महीला शहर भद्रावती शहर समन्वयक  सौ भावनाताई खोब्रागडे, शिवसेना सघंटीका सौ वर्षाताई कुरेकार,वरोरा शहर सघंटीका शुभागी अहीरकर, प्रा.सौ प्रितिताई पोहाने(कामडी) यांच्या नेतृत्वात  पार पडला.मराठी नववर्षाप्रमाणे भाद्रपद महिण्यातील शुध्द पक्षात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे गौरीपुजा महिलांसाठी महत्त्वाचा मानला जातो.


गौराई माझी लाडाची ग…..* या कार्यक्रमाअंतर्गत गौरी सजावट स्पर्धा व मॅचींग वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक स्त्रियांनी भाग घेतला, स्पर्धेमध्ये सुरूवातीची तीन बक्षिसे देण्यात आली व सर्व सहभागी स्त्रीयांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. 

यात गौरी सजावट स्पर्धेमध्ये 
पहिले पारितोषीक शुभांगी अहिरकर, 
व्दितीय पारितोषीक शुभांगी धवने व 
तृतीय पारितोषीक शारदा गोहणे यांना मिळाले. 
वेशभुषा स्पर्धेमध्ये
प्रथम पारितोषीक अश्लेषा जीवतोडे  
व्दितीय पारितोषीक सुनंदा साठोने यांना मिळाला. यावेळी स्पर्धेचे परिक्षक म्हणुन नर्मदाताई बोरेकर, निलीमाताई शिंदे, सुष्माताई शिंदे, वर्षाताई कुरेकार यांनी कार्य पार पाडले. 

यावेळी जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर, वरोरा तालुका संघटीका, सरलाताई मालोकर, भद्रावती तालुका संघटीका, आशाताई ताजणे, निलीमाताई शिंदे, सुष्माताई शिंदे, संचालक, वि.का.सह.संस्था, भद्रावती, जिल्हा युवती समन्यवयक तथा कृ.उ.बा.स.उपसभापती अश्लेषा जिवतोडे, भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, वर्षाताई कुरेकार, शिलाताई आगलावे, वरोरा शहर संघटीका शुभांगी अहिरकर, शुभांगी धवने, मुक्ता हजारे, आदी महिलांची उपस्थिती होती. शिवालय येथे *गौराई माझी लाडाची ग…..* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Comments