वरोरा
अनिल पाटील
पत्रकारांसाठी दरवर्षी किशोरभाऊ टोंगे यांच्या हस्ते पत्रकारांसाठी दहा लाख रुपयाचा विमा काढल्या जातो. यावर्षी सुद्धा न विसरता पत्रकारांसाठी त्यांनी दहा लाख रुपये राशीचा विम्याचे संरक्षण पत्रकारांसाठी नूतनीकरण करून घेतले आहे. पत्रकारांसाठी सामाजिक दायित्व जपणारे किशोरभाऊ टोंगे पत्रकारकवच बनले आहे. न चुकता पत्रकारांना बोलवून त्यांच्याकडून दहा लाख रुपये विम्याचे नूतनीकरण करून त्यांची विचारपूस त्यांनी करून घेतली. या प्रेमळ स्वभावामुळे पत्रकारांनी त्यांचे आभार मानले असून येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
मागील वर्षी 15ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावर्षी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरोरा शहरातील व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांना विम्याचे नूतनीकरण करून घेतले आहे.
यापुढेही पत्रकारांचे सर्व विमा पॉलिसी किशोरभाऊ टोंगे कडून नूतनीकरण करून देणार असल्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर टोंगे, प्रमुख अतिथी पत्रकार अनिल पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक रवी खाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शुभम आमने यांनी केले. यावेळी चेतन लुथडे, रवि खाडे, अविनाश बन, सारथी ठाकुर, अशोक घाडगे, अनिल नौकरकर, सादिक थैम, खेमराज नेरकर सह वरोरा तालुक्यातील अनेक पत्रकारांनी हजेरी लावली होती.
Comments
Post a Comment