अतुल कोल्हे भद्रावती :-
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व्दारा आयोजित जिल्हा स्तरिय कॅरम स्पर्धेत स्थानिक श्री साई कॉन्व्हेंट च्या खेळाडूची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
चंद्रपुर येथील क्रिडा संकुलन येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धेत१४ वर्षों आतील मुलांच्या संघात कॅरम स्पर्धेत वर्ग ८ चा खेळाडू रोनक देरकर यांची विभागीय स्तरावर कॅरम स्पर्धे करिता निवड झाली आहे. सदर स्पर्धा २६ सप्टेंबर रोजी भंडारा येथील जिल्हा क्रिडा संकुलन येथे होणार आहे. खेळाडू ने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका कु. किरण कोथळे , क्रीडा शिक्षक सुनील दैदावार,वर्ग शिक्षिका,आई आणि वडील यांना दिले आहे. संस्थेचे सचिव प्रा.अतुल गुंडावार, रूपा गुंडावार यांनी खेळाडू चे अभिनंदन केले व पुढील खेळा करिता शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment