वडगाव वाशीयांचे मतदान 20 किलोमीटरवर असणाऱ्या बोपापुरला.

वडगाव वाशीयांचे मतदान 20 किलोमीटरवर असणाऱ्या बोपापुरला.

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. 

दत्ता बोरेकर यांच्या नेतृत्वात वडगाव वाशीयांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना

वरोरा 
चेतन लुतडे 

महाराष्ट्रातील आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 75 वरोरा विधानसभेमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम आलेला असून त्यानुसार मतदान केंद्र ठरविण्यात आलेले आहे. मात्र याच वर्षी वडगाव येथील मतदान केंद्र 9 बोपापूर इथे दिल्याने गावकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. 

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गटातील तालुकाप्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांच्या नेतृत्व वडगाव गावातील रहवाशांची समस्या वरोरा येथील उपविभागीय अधिकारी झेनीत चंद्रा यांच्याकडे मांडण्यात आली आहे. 
शासनाकडून मतदान केंद्र निर्माण करीत असताना मंडळ अधिकारी ,बी एल ओ, पटवारी मार्फत काम करीत असतात. यावेळी गावाची यादी प्रसिद्ध केली जाते. मात्र ती केली नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे. 

गावकऱ्यांना दोन किलोमीटरच्या आतील सर्वात जवळचे बूथ दिल्या जाते. मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीच्या प्रस्तावामुळे  आजनगाव बूथ क्रमांक 9 मध्ये असलेले आज पर्यंतचे वडगावचे साधारणता 334 मतदान  20 किलोमीटर दूर असलेल्या बोपापूर मतदान बूथ क्रमांक 9 मध्ये गेलेले आहे. त्यामुळे वडगाव गावातील नागरिक रोष व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याच्या मार्गावर आहे. सदर बाब गावकऱ्यांनी  अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. त्यामुळे नेमकी चूक कोणाची आहे. हे अधिकारी ठरवतीलच परंतु त्वरित वडगाव नागरिकांना मतदान केंद्र बदलवता येईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

वरिष्ठांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता नमुना आठ अ सगळ्या नागरिकांना भरावा लागेल यासंदर्भात बीएलओ जवळ असणाऱ्या ॲप मध्ये हा डाटा येणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. 

यासंदर्भात स्थानिक बिएलओ यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भात मंडळ अधिकारी मॅडमला या गोष्टी सांगितल्या होत्या मात्र त्या तशाच राहिल्याने हा गोंधळ झाल्या असल्याची शक्यता वर्तवली.



Comments