दरवर्षी करतात रक्तदान शिबिराचे आयोजन.
वरोरा
जय अंबे शारदा उत्सव मंडळ वरोरा व अमन ब्लड बँक नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने 11 ऑक्टोबर 2024 ला वनविभाग कार्यालय जवळ खांजी वॉर्ड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.43 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन
सन्मानित करण्यात आले.दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने धार्मिक विधिवत पूजा -अर्चा करून नवरात्री उत्सव साजरा करण्यात येतात.
जाहिरात
जय अंबे शारदा उत्सव मंडळाच्या घटस्थापनेला आज 20 वर्ष पूर्ण झाली असून पहिली घटस्थापना शारदा उत्सव मंडळ तयार करून बालपनी सामाजिक कार्यकर्ता आलेख रट्टे यांनी मातीची छोटीशी शारदा देवीची मूर्ती तयार करून बसवून सुरवात केली.त्यानंतर यवतमाळ येथून सुप्रसिद्ध मूर्तिकार निलेश देशमुख यांचेकडून मूर्ती तयार करून आणण्यास सुरुवात केली. सामाजिक दायित्व जोपासून दरवर्षी ब्लड कॅम्प घेण्याचा उपक्रम राबविल्या जातात. यावर्षाला जय अंबे शारदा उत्सव मंडळ वरोरा व अमन ब्लड बँक नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने 11 ऑक्टोबर 2024 ला वनविभाग कार्यालयाजवळ खांजी वॉर्ड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 43 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाला' रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान 'असा संदेश दिला.शारदा उत्सव मंडळाने आकर्षक असे डेकोरेशन आणि देखावे आणि रोषणाई यामुळे शहरामध्ये एकमेव शारदादेवी आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरले. या वर्षाला आलेख रट्टे यांचे पुढाकाराने तृतीयपंथीयांना साडी व ओटी देऊन सन्मान करण्यात आला. सर्वधर्मीय आरती केल्या जातात. दरवर्षाला सामाजिक दायित्व जोपासून विवीध सामाजिक उपक्रम राबविण्यात शारदा उत्सव मंडळ खांजी वॉर्ड ची परंपरा सुरु आहे.मंडळाचे आलेख रट्टे यासह अमोल लोखंडे, मनीष नंदनवार, अमित घोडमारे, रितिक जाधव, शुभम सुराणा, अक्षय रासेकर, आशिष लेते, संजय कुंभरे, पवन बोडे, चेतन महाडुळे, वैभव गावस्कर, यश लोणारे, वेदांत गजबंदे, प्रवीण गंधारे, पियुष गोडबोले आणि समस्त जय अंबे शारदा उत्सव मंडळ सदस्य व पदाधिकारी सहकार्य करीत असतात.
जाहिरात
Comments
Post a Comment