प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेसाठी 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची सवलत.

प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेसाठी 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची सवलत.

21 ते 24 वयोगटातील युवकांना संधी. 

500 मोठ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये 125000 इंटर्नशीप रोजगार युवकांना मिळणार.

फक्त बातमी 12/10/2024
चेतन लुतडे

केंद्र सरकारने बेरोजगारीवर तोडगा काढत 125000  इंटर्नशीप रोजगार मोठ्या कार्पोरेट कंपन्यांमध्ये बारा महिन्यांसाठी 21-24 वयोगटातील युवकांना देण्याचे मोठे पाऊल उचलले आहे.
भारत सरकार  ने जारी केलेल्या वेबसाईटवर जाऊन युवकांना अर्ज येत्या 12 ऑक्टोंबर तारखेपासून 25 तारखेच्या आत भरायचे आहे. युवकांसाठी ही चांगली संधी असून भारतातील टॉप 500कंपनीतील इंटर्नशीप  रोजगार एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. यामध्ये भारत सरकारकडून 4500 आणि उद्योगाकडून 500 रुपयाची मासिक मदत युवकांना केली जाणार आहे. प्रासंगीकासाठी 6000 रुपयाचे एक वेळचे अनुदान सुद्धा देण्यात येत आहे. 

भारत सरकारच्या प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे प्रत्येक इंटर्न  साठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. 
या योजने अंतर्गत पाच वर्षात तरुणांना एक कोटी इंटर्नशीप रोजगार देण्याची लक्ष ठरविण्यात आले आहे.

 *पात्र उमेदवारांना* IT आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बँकिंग आणि वित्तीय सेवा, तेल, वायू आणि ऊर्जा, धातू आणि खाणकाम, FMCG (फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स), दूरसंचार, पायाभूत सुविधा आणि बांधकाम, किरकोळ आणि ग्राहक टिकाऊ वस्तू यासह विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप मिळेल. , सिमेंट आणि बांधकाम साहित्य, ऑटोमोटिव्ह, फार्मास्युटिकल, विमानचालन आणि संरक्षण, उत्पादन आणि औद्योगिक, रसायन, मीडिया, मनोरंजन आणि शिक्षण, कृषी आणि संबंधित, सल्ला सेवा, कापड उत्पादन, रत्ने आणि दागिने, प्रवास आणि आदरातिथ्य आणि आरोग्य सेवा. या विभागात तरुणांना संधी मिळणार आहे.

या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती 25 तारखे पर्यंत नोंदणी करायची आहे.





Comments