लोकमान्य विद्यालयाच्या हर्षितची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड**तब्बल 28 वर्षानंतर ऐतिहासिक कामगिरी*

*लोकमान्य विद्यालयाच्या हर्षितची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड*

*तब्बल 28 वर्षानंतर ऐतिहासिक कामगिरी*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                   शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या हर्षित प्रवीण कवाडे ची १७ वर्षाखालील गटामध्ये राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून  तो यानंतर उत्तर प्रदेश मधील बरेली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये  महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
क्रीडा युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दिनांक ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ ला नागपूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने नागपूर विभागाचे नेतृत्व केले होते या स्पर्धेमध्ये हर्षित ने उत्कृष्ट कामगिरी केली व महाराष्ट्र राज्याच्या संघात आपले स्थान मिळवून लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व भद्रावतीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला. विशेष म्हणजे भद्रावतीच्या व्हॉलीबॉल इतिहासातील हा तब्बल 28 वर्षानंतर चा दुसरा खेळाडू आहे    ज्या खेळाडूची निवड महाराष्ट्र राज्य शालेय व्हॉलीबॉल संघात झाली आहे. हर्षितच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, लोकसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रूपचंद धारणे,पर्यवेक्षक प्रफुल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, रविंद्र नंदनवार, प्रतीक नारळे, कु.प्रतीक्षा खुजे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले. हर्षितने यशाचे श्रेय प्रवीण झाडे, राजेश मत्ते,प्रफुल चटकी, आदर्श आसुटकर, स्वप्निल उंमरे यांना दिले.

[ हर्षितची निवड ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब ]

हर्षित कवाडेची राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी  महाराष्ट्र राज्य संघात झालेली निवड निश्चितच आमच्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. अमृत महोत्सवी वर्षात विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाला मिळालेली ही फार मोठी मिळकत आहे. हर्षितच्या  राष्ट्रीयस्तरावरील अनुभवाचा फायदा निश्चितच भद्रावतीतील  अन्य हॉलीबॉल खेळाडूंना होणार आहे. त्यामुळे भद्रावतीकरांसाठीही ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

Comments