75 वरोरा विधानसभेचा तिढा सुटता सुटेला. स्थानिक खासदाराचा नाराजीचा सूर...75 वरोरा विधानसभा तुतारीला जाण्याची शक्यता.
75 वरोरा विधानसभा तुतारीला जाण्याची शक्यता.
वरोरा
चेतन लुतडे
महाराष्ट्र विधानसभा 2024सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन अर्ज दाखल झाले असून. 29 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची तारीख आहे.
मात्र राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची मुंबई वारी समता संपत नाही. अजून पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा ,चंद्रपूर विधानसभा मधील तिढा कायम आहे.
महा विकास आघाडीतील तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दालनात बैठकी सूरू झाल्या आहेत. यामध्ये वरोरा विधानसभेची जागा तुतारी या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मागितली असल्याचे सूत्राद्वारे कळाले आहे.
त्यामुळे स्थानिक खासदार प्रतिभा धानोरकर या नाराज असून स्थानिक नेते व पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस तर्फे हे उमेदवार होऊ शकतात.
70-राजुरा विधानसभेत काँग्रेसचे सुभाष धोटे ,
71-चंद्रपूर विधानसभेत काँग्रेस तर्फे राजू भाऊ झोडे ,
72-बल्लारपूर विधानसभेत काँग्रेस गावूतरे मॅडम ,
73-ब्रम्हपुरी विधानसभेत काँग्रेस विजय वडेट्टीवार ,
74-चिमूर मतदारसंघातून काँग्रेसचे सतीश वारजूरकर
75-वरोरा विधानसभा मतदारसंघात तुतारी या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अनिल धानोरकर. यांची संभावना व्यक्त केली जात आहे.
भाजपातर्फे वरोरा भद्रावती विधानसभेत श्वेता देवतळे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
गोंडवाना गणतंत्र पक्क्षा तर्फे रमेश मेश्राम यांची उमेदवारी आहे.
प्रहार पक्षातर्फे वरोरा भद्रावती विधानसभेत एहेतेशाम अली निवडणूक लढू शकतात.
मनसेतर्फे प्रवीण सुर विधानसभेत उतरणार आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून डॉक्टर चेतन खूटेमाटे व मुकेश जीवतोडे लढण्याच्या तयारीत आहे.
या सर्व भूमिकेत शिवसेनेचे रवींद्र शिंदे व नितीन मत्ते यांची सावध भूमिका असून पक्षश्रेष्ठीने दिलेल्या आदेशाने काम करण्याचे दर्शविले आहे.
वरोरा भद्रावती विधानसभेत उमेदवार एबी फॉर्म जोपर्यंत अर्जाला जोडत नाही तोपर्यंत हा तिढा कायम राहील अशी शक्यता वाटत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
००००००
Comments
Post a Comment