हायड्रोजन सोलर पॅनल तंत्रज्ञान येणार असून हे नवीन सोलर पॅनल आता रात्रीच्या वेळी देखील वीज निर्माण करू शकणार आहेत
या प्रक्रियेमध्ये हवेतील पाणी काढण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात व टाक्यांमध्ये हायड्रोजन साठवतात. टाक्यांमध्ये साठलेला हा हायड्रोजनचा वापर रात्रीच्या वेळी घरगुती उपकरणे चालवण्यासाठी केला जातो.पारंपारिक सोलर पॅनलला रात्री बॅकअप पावर करिता बॅटरीची गरज असते. परंतु बॅटरीचे आयुष्य मर्यादित असते आणि ती दर पाच ते सहा वर्षांनी बदलणे आवश्यक असते.
परंतु या तुलनेत हायड्रोजन सोलर पॅनल सोबत बॅटरी बॅकअपची आवश्यकता नसते. हे पॅनल्स हायड्रोजन साठवतात आणि वारंवार वीज खंडित होत असताना किंवा कमी सूर्यप्रकाश असलेल्या भागातही वीज पुरवू शकतात. हे पॅनल हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करून ऊर्जा निर्माण करतात.ते सूर्यप्रकाश आणि हवेतील पाण्याची वाफ वापरून कार्य करतात.
या पॅनलमध्ये प्रामुख्याने दोन मुख्य घटक असतात व त्यातील पहिला म्हणजे फोटो वोल्टईक म्हणजेच पीव्ही थर आहे जो सूर्यप्रकाशाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी नियमित सौर पॅनलप्रमाणे काम करतो आणि दुसरा हायड्रोजन उत्पादक स्तर असून जो त्या ऊर्जेचा वापर हायड्रोजन तयार करण्यासाठी करतो. या हायड्रोजन उत्पादक स्तरांमध्ये नळ्यांचे जाळे असते व या माध्यमातून हवेतून पाण्याची वाफ काढली जाते.
ही काढलेली पाण्याची वाफ इलेक्ट्रोकॅटलिस्ट वापरून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूमध्ये विभागली जाते. पिव्ही लेयर इलेक्ट्रो कॅटलिस्टला शक्ती प्रदान करते. ज्यामुळे ही प्रक्रिया सक्षम होते. त्यानंतर हायड्रोजन वायू टाक्यांमध्ये साठवला जातो आणि थेट इंधन गरम करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.
काय आहेत हायड्रोजन सोलर पॅनलचे फायदे?
हायड्रोजन सोलर पॅनल पारंपारिक सौर पॅनलपेक्षा प्रति चौरस फूट जास्त वीज निर्माण करतात व हे सौर पॅनल विजेसाठी थेट सूर्यप्रकाशावर अवलंबून नसतात आणि कमी प्रकाशाच्या परिस्थितीत देखील उत्तम काम करतात. यामध्ये अतिरिक्त ऊर्जा हायड्रोजन गॅस म्हणून साठवली जाते व ती 24 तास विजेचा पुरवठा करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
तसेच या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा तयार होते व पर्यावरणाचे देखील नुकसान होत नाही.साधारणपणे हे हायड्रोजन सौर पॅनल 2026 पर्यंत घरगुती आणि व्यवसायिक वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्यता असून अजून पर्यंत ते बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे अजून पर्यंत या पॅनल ची किंमत किती असेल हे सांगता येणार नाही.
Comments
Post a Comment