*यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचा कबड्डी संघ महाराष्ट्रात अव्वल**राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भद्रावतीचा संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार*

*यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचा कबड्डी संघ महाराष्ट्रात अव्वल*

*राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भद्रावतीचा संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार*

*भद्रावतीच्या कबड्डी संघाने इतिहास घडविला : नागपूर विभागाचा राज्यात डंका*

अतुल कोल्हे भद्रावती :-
                 भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील १७ वर्षे वयोगटातील कबड्डीचा संघ राज्यस्तरीय झालेल्या कबड्डी स्पर्धेत अव्वल ठरला आहे. सांगली जिल्ह्यात प्रतिनिधी हायस्कूल कुंडल तालूका पलूस येथे 
 झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या १७ वर्षे वयोगटातील कबड्डीच्या संघाने नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात संभाजीनगर च्या संघाला धोबीपछाड देत महाराष्ट्रात प्रथम येवून उच्चांक गाठला.   हा कबड्डी संघ आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील १७ वर्षे वयोगटातील कबड्डी संघाने जिल्हास्तर, विभागस्तर यशस्वीपणे पादाक्रांत करत राज्यस्तरावर मजल गाठली.  एवढेच नाही तर राज्यस्तरावर झालेल्या कबड्डी सामन्यात विजय संपादन करून, आता हा संघ महाराष्ट्राचे नेतृत्व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये करणार आहे. ही ऐतिहासिक बाब भद्रावती तसेच नागपूर विभागासाठी आहे. या विजयी संघात ओम होळकर, कैवल्य पाटील, यशराज  आडके, श्रेयश गायकवाड, सतीश वळकुंजे, समर्थ पाटील, सर्वेश नेहरे, सार्थक नाईक, हर्षद माने, हर्षवर्धन पाटील,  श्रेयश रायपुरे, यश रायपुरे या खेळाडूंचा समावेश आहे.

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विजयी संघाचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष, डॉ विवेक शिंदे, सचिव, डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव, डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, क्रीडा मार्गदर्शक प्रा. रमेश चव्हाण, बांदल सर, नार्वेकर मॅडम , डॉ सुधीर मोते, डॉ ज्ञानेश हटवार, डॉ प्रशांत पाठक, प्रा शेखर जुमडे,  किशोर ढोक, माधव केंद्रे, अतुल गुंडावार, क्रीडा अधिकारी चंद्रपूर, क्रीडा अधिकारी नागपूर, अमोल रोडे, नेहाल काळे,अमित ढवस, शुभम सोयाम, बंडू पेंदोर, समस्त शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच  परिसरातील क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन  केले व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. भद्रावती सारख्या ग्रामीण भागातील कबड्डी संघांने ही मारलेली गरुड झेप आहे.  राज्य स्तरावर प्रथम आलेल्या खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रात तसेच परिसरात कौतुक होत आहे.

Comments