वरोरा भद्रावती विधानसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत चर्चा.राजकीय पक्षाचे राजकुमार अजूनही गुलदस्त्यातच.

वरोरा भद्रावती विधानसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत चर्चा.

राजकीय पक्षाचे राजकुमार अजूनही गुलदस्त्यातच. 


चेतन लुतडे 
17/10/2024

 *वरोरा भद्रावती विधानसभेतील महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे संभावित उमेदवार निश्चित नसून उमेदवारी मिळविण्यासाठी वरोरा -मुंबई -दिल्ली असा प्रवास इच्छुक उमेदवार करत असल्याचे दिसत आहे.* 
काँग्रेस पक्षातर्फे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना संभावित उमेदवार म्हणून पाहिल्या जात आहे. तर डॉक्टर चेतन खूटेमाटे काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहे. या दोन्ही राजकुमारांचे गॉडफादर वेगळे असले तरी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचेच बाहुबल चालेल असे एकंदरीत दिसत आहे.  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादी  सध्या थंड बसली असून आघाडी धर्म पाळेल असे चिन्ह दिसत आहे.
तर दुसरीकडे भाजपाचे हेवीवेट नेते सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी बल्लारशा विधानसभेतून तर काँग्रेसचे नेते ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार निश्चित समजले जाते. नवोदित खासदार प्रतिभा धानोरकर जिल्ह्यातील राजकारणातील सूत्रधार ठरू शकतात. जिल्ह्यातील हेवीवेट नेत्यांना निवडून येण्यासाठी जिल्ह्यातील राजकारणात त्यांच्या विरुद्ध दिलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर त्यांचा विजय ठरवण्यात येणार आहे . त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाची विजयाची दोरी हेवीवेट नेत्यांच्या  एकमेकांच्या  हातात दिसत आहे.

माजी खासदार बाळू धानोरकर यांचे भाऊ अनिल धानोरकर यांना उमेदवारी मिळविण्यासाठी हेवीवेट नेते कामाला लागले असून भाजपाची किंवा एकनाथ शिंदे शिवसेना गटाची उमेदवारी अनिल धानोरकर यांना मिळावी यासाठी दिल्ली येथून प्रयत्न सुरू झाले आहे. मात्र भाजपाकडे वरोरा भद्रावती विधानसभेत स्पष्ट चेहरा नसल्यामुळे ही उमेदवारी एकनाथ शिंदे गटातील शिवसेना या पक्षाला जाऊ शकते. या पक्षाचा चेहरा म्हणून अनिल धानोरकर हे उमेदवार होऊ शकतात. मात्र यामध्ये  शिंदे गटातील शिवसेनेच्या उमेदवाराला स्थानिक शिवसेना नेते नितीन मत्ते व भाजपा नेते रमेश राजुरकर यांच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध पत्करावा लागेल. 

दोन्ही महत्त्वाच्या पक्षाकडून नाकारल्या नंतर इच्छुक उमेदवाराला बहुजन वंचित आघाडीचा सहारा घ्यावा लागेल. यामध्येही मागील विधान सभेप्रमाणे फिक्सिंग झाल्यास याही पक्षाचा उमेदवार कमजोर असण्याची शक्यता आहे. 
ऐहतेशाम अली, डॉक्टर खुटेमाटे, मुकेश जीवतोडे, नितीन मत्ते, अमोल बावणे, रमेश मेश्राम, दत्ता बोरेकर  अपक्ष लढतील अशी चर्चा व्यक्त केली जात आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी सावध भूमिका घेत पक्ष आदेशानुसार मी काम करत राहील अशी भूमिका घेतल्याने आघाडी धर्म पाळतील असाच संकेत मिळत आहे. आम्ही उभारलेल्या ट्रस्ट नुसार सामाजिक बांधिलकी जपत अविरत काम करण्याचे आश्वासन जनतेला दिलेले आहे. पक्षाच्या ध्येय धोरणा व्यतिरिक्त काम करणाऱ्यास निलंबनाची कारवाई करणार असल्याचेही बोलले.

वरोरा भद्रावती विधानसभेची राजकारण चांगलेच तापले असून  इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी वाढली आहे. काँग्रेस तर्फे प्रवीण काकडे आणि शिवसेना किंवा भाजप तर्फे अनिल धानोरकर अशी लढत होऊ शकते अशी चर्चा विधानसभेमध्ये जोर धरू लागली आहे. 

लोकशाहीमध्ये नेत्यांनी लोकांना मतदानासाठी गृहीत धरू नये. वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये यावेळेस अपक्ष उमेदवाराची लॉटरी लागू शकते हेही तितकेच करे.

Comments