आयुध निर्माणी चांदा येथे दारूगोळा प्रदर्शनीचे महाप्रबंधक विजयकुमार यांचे हस्ते उद्घाटन**प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घेण्याचे आवाहन*
*प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घेण्याचे आवाहन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
आयुध निर्माणी चांदा वसाहतीतील सार्वजनिक सभागृहात दिनांक 1 ऑक्टोबर रोज मंगळवारला दुपारी तीन वाजता दोन दिवसीय दारूगोळा प्रदर्शनीचे उद्घाटन निर्माणचे महाप्रबंधक विजयकुमार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी निर्माणीचे अन्य अधिकारी उपस्थित होते. सदर प्रदर्शनी 2 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार आहे. सदर प्रदर्शनीत आयुध निर्माणी चांदा येथे उत्पादित करण्यात येत असलेल्या दारूगोळा प्रतिकृती प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. यात पिनाका मिसाईल, विविध प्रकारचे बॉम्ब, राकेट आदींचा समावेश आहे. सदर प्रदर्शनीचा लाभ परिसरातील विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महाप्रबंधक विजयकुमार यांनी यावेळी केले आहे.
Comments
Post a Comment