आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन. देशी दारू सह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन. 
देशी दारू सह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त.

वरोरा 
फक्त बातमी 

 विधानसभा निवडणुक -२०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाकू तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासंबंधीत  तसेच जिल्हा रात्रगस्तकामी  परिसरात पेट्रोलौंग करीत असतांना गुप्त माहितीच्या आधारे एका लाल रंगाची कार क्र. एमएच ०१ व्हीए ७१०५ मध्ये नागपूर ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क. ४७ वरून अवैध देशी दारूची वाहतुक करणार असल्याची  खात्रीशीर खबर मिळाल्याने नाकेबंदी केली होती.
 संशयित कार थांबवुन कारची पाहणी केली असता त्यामध्ये रॉकेट देशी दारू संत्रा प्लास्टिक बॉटल, ९० मीली, किं. ३५/-रू असलेल्या कागदी खोक्यामध्ये २१ पेट्या दिसून आल्या. त्यावरून नमुद वाहनामधील वाहन चालक व इतर तिन लोकांना त्यांचे नाव, गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे सांगितले. वाहनचालक गाडी मालक - १) पवन अशोक अंड्स्कर, वय २७ वर्षे, चंदा वाहन चालक, रा. मालविय वॉर्ड, वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर २) राजु दैवैया कंटुकुरी, वय ३८ वर्षे, चंदा दारू दुकानावर मजुरी, राःमालवीय वॉर्ड, ता. वरोरा ३) अधिक उर्फ गोलू चंद्रकात बोरकर, वय २९ वर्ष, धंदा मजुरी, रा. बस स्टॉपजवळ, खांबाडा, ता. वरोरा, ४) निलेश रमेश मेश्राम, वय २८ वर्षे, धंदा मजुरी, रा. मालवीय वॉर्ड, वरोरा  सांगितले. पंचाचे समक्ष असलेल्या कारमध्ये सर्व पेटयामध्ये रॉकेट देशी दारू संत्रा प्लास्टिक बॉटल, ९० मौली, किं. ३५/-रू असलेल्या दिसून आल्या. 

कागदी खोक्यामध्ये रॉकेट देशीबिटिल, ९० मीली, किं. ३०/- असलेल्या एकुण २१ पेटया एका पेटीमध्ये १०० बॉटल एकूण २१०० बरित, एकुण किं ३५००/- त्यापैकी (एक बॉटल रासायनिक विश्लेषणकामी सिलबंद करण्यात आली आहे में 3160CT2024)

एक लाल रंगाची कार, एमएच-०१ व्हीए-१९०५,
मॉडेल क्र. SWIFT VXI BS III देखील
येगीग . MA3EYE41500178457 इंजिन नं. G13BBN309937.

पवन अशोक अंडम्कर ग. मालविय वॉर्ड, वरोरा यांचे नावे असलेली जुनी वापरती कार  अंदाजे कि. ५ लाख रूपये असा एकुण ५,०३,५००/- चा माल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. पटनास्थळ/ जप्ती पंचनामा कार्यवाही दि. २१/१०/२०२४ रोजी ०८.१५ ते ०९.३० वा दरम्यान विधानसभा निवडणुक २०२४ आंतरजिल्हा खाबांडा एम एस टी चेक पोस्ट नागपूर ते चंद्रपुर महामार्ग क. ४७ येथे करण्यात आली आहे. पंचानामा कार्यवाही दरम्यान ई-साक्ष अंगमध्ये व्हिडीओ चित्रीकरण व फोटो घेण्यात आले असुन भारतीय माध अधिनियम कलम ६३ (क) (४) अन्वये ईश वॉल्यु प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपी वाहनचालक/गाडी मालक १) पवन अशोक अंडरकर, वय २७ वर्षे, घंटा वाहन बालक, रा. मालविय वॉर्ड, वरोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर २) राजु दैवैया कंदुकुरी, वय ३८ वर्षे, चंदा दारू दुकानावर माधुरी, रा.मालवीय वॉर्ड, बदन राउत यांचे परी किरायाने ता. करोग, जि. चंद्रपूर ३) अधिक उर्फ गोलू चंद्रकात बोरकर, वय २९ वर्ष, चंदा मजुरी, रा. बस स्टॉपजवळ, खांबाडा, ता. वरोरा, जि चंद्रपूर ४) निलेश स्मेश मेश्राम, वय २८ वर्षे, बंदा मजुरी, ग. मालवीय वॉर्ड, वरोरा, ता वरोरा, जि चंद्रपूर यांनी संगणमत करून विनापरवाना अवैधरित्या देशी दारू ताब्यात बाळगुन चारचाकी वाहनाने वाहतुक केली तसेच देशी दारू परवान्यानुसार शासनाने दिलेल्या निर्देशाचे राजु दैवैया कंदुकुरी यांनी उल्लथन केले आहे. करीता नमुद  आरोपीविरूब्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई),८२,८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमूक्का सुदर्शन  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक रिना जनबंदू  , गुन्हे शोध पथकाचे प्रमुख कोंढावार , धनराज करकाळे, सफी/२०६७ स्वामीदास चालेकर, पोहवा/८११ नितिन कुरेकर, पोडवा /१७८४ अजय बागेसर, पोशि/१२४७ शंशाक बदामवार, पोशि गणेश भोयर सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर , पोलीस नियत्रण कक्ष, चंद्रपुर यांनी कारवाई केली.

Comments