श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू

*श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू*

अतुल कोल्हे भद्रावती :-
            शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार पगार देण्यात यावा, कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते व इतर भत्ते नियमानुसार मिळावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यासाठी शहरालगत असलेल्या श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा व श्री साई तंत्र निकेतन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापना विरोधात दिनांक तीन रोज गुरुवार पासून महाविद्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. या धरणे आंदोलनात सदर महाविद्यालयातील 20 ते 22 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार पगार देण्यात यावा,महागाई व इतर भत्ते नियमानुसार देण्यात यावे, कर्मचाऱ्यांची नियमानुसार पदोन्नती करण्यात यावी, सर्विस बुकावर सर्व नोंदण्या चालू पगाराप्रमाणे अपडेट करण्यात याव्या, कर्मचाऱ्यांना नियमानुसार ग्रॅज्युएटी देण्यात यावी, कर्मचाऱ्यांना पगार परिपत्रक देण्यात यावे,सॅलरी स्लिप ची सत्यप्रत कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशा मागण्या सदर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन व्यवस्थाकांसमोर ठेवल्या आहेत. सदर धरणे आंदोलनात विशाल शिंपी, वैभव पिंपळशेंडे, आशीष सपाट,सुभाष जाधव,प्रदीप डाहुले, मालुताई काकडे,संगीता गोचे यांचे सह महाविद्यालयातील अन्य शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Comments