अतुल कोल्हे भद्रावती :-
कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील आदिती कॉटन इंडस्ट्रीज उपबाजारात दिनांक 26 पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे यांच्या हस्ते सोयाबीन व कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी 363 क्विंटल सोयाबीन व 101 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. याप्रसंगी सभापती भास्कर ताजने, उपसभापती आश्लेषा भोयर, संचालक गजानन उताणे, मनोहर आगलावे, कानोबा तिखट, प्रवीण बांदुरकर, राजेंद्र डोंगे, सचिव नागेश पुनवटकर, आदिती कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक अविष बाहे, नंदोरी ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पहिल्या दिवशी कापूस व सोयाबीन विक्रीसाठी आलेले शेतकरी सुरेश काळे, शत्रुघ्न पिदुरकर, रवींद्र विधाते, संदीप ढेंगळे, मंगेश विरुटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समितीचे कर्मचारी संजय शेंडे, प्रवीण राहुलगडे, विलास पालकर, अरुण पाठक यांनी सहकार्य केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नंदोरी आवारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती भास्कर ताजणे, उपसभापती आश्लेषा भोयर व सचिव नागेश पुनवटकर यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment