*माहेरांगण महिला मंडळाची "अभिनव नवरात्र " संकल्पना.* हनी मम्मी पब्लिक स्कूल च्या दाक्षायनी मुख्याध्यापकेची नवी संकल्पना.

*माहेरांगण महिला मंडळाची "अभिनव नवरात्र " संकल्पना.* 

हनी मम्मी पब्लिक स्कूल च्या दाक्षायनी मुख्याध्यापकेची नवी संकल्पना. 

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा शहरात माहेरांगण महिलांचा ग्रुप आहे जो सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तू ,शालेय वस्तू, अशा अनेक प्रकारच्या मदत सन 2016 पासून करीत आहे. नवरात्रीच्या सणानिमित्त अनेक कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र वरोरा शहरातील माहेरांगण या महिला ग्रुपने अनोखा कार्यक्रम सादर केला आहे.

6 ऑक्टोबरला एकदिवशीय झालेल्या कार्यक्रमांमध्ये महिलाचे वेगवेगळे कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये समाजप्रती झटणाऱ्या नऊ महिलांचे फोटो चित्र लावून हा कार्यक्रम अभिनव नवरात्र म्हणून साजरा करण्यात आला. 

  ज्या स्त्रियांनी संघर्ष रूपी राक्षसाशी लढून आयुष्यात खरा विजय मिळविला, प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात माँ दुर्गा, माँ महाकाली बनून रयतेचे रक्षण केले, शिक्षणासाठी जीवाचे रान करून महिलांना मानाचे स्थान मिळवून दिले त्या सर्व श्रेष्ठ महिलांचे एक *अभिनव नवरात्र* सौ दाक्षायणी यांच्या अभिनव कल्पनेतून साजरा करण्यात आला.

माई सावित्री, राजमाता जिजाऊ, पुण्य श्लोक अहिल्याबाई, माता रमाई, ताराबाई, हिरकणी, झाशीची राणी, साधना ताई आमटे, सिंधुताई सपकाळ, इत्यादि गौरवास्पद ऐतिहासिक नऊ स्त्रियांचे फोटो लावून  एक दिवसीय नवरात्र" हनी मम्मी पब्लिक स्कूल" च्या प्रांगणात " माहेरांगण" या गृहिणी असणार्‍या महिलांच्या ग्रुप तर्फे साकार करण्यात आले. 
समाजात असा बदल व्हावा, ऐतिहासिक महिलांची अश्या प्रकारे दखल घेतली जावी, भावी पिढीला स्त्री शक्तीचा इतिहास कळावा, आणि नऊ दिवसांच्या देवीच्या नवरात्री मंडपात यासारख्या शूर महिलांच्या सुद्धा प्रतिमा ठेवल्या जाव्यात, अशी माहेरांगण संस्थेच्या संस्थापिका सौ दाक्षायणी यांनी इच्छा प्रदर्शित केली. 
या  कार्यक्रमाला प्रिन्सिपल राधा सवाने मॅडम,आनंदवन च्या पल्लवी ताई आमटे वकील भावना लोया मॅम,आणि विस्तार अधिकारी येरमे मॅम उपस्थित होत्या. पहिल्यांदा असे अभिनव कार्य संपन्न होत असल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.या  कार्यक्रमाचे नियोजन आणि आरत्या कौतुकास्पद आणि चर्चेच्या ठरल्या. शेकडो  स्त्रिया या कार्यक्रमात उपस्थित होत्या. सर्वांना भेटवस्तू आणि नाश्ता देण्यात आला. संपूर्ण माहेरांगण ग्रुप च्या सदस्यांचे वरोरा शहरात कौतुक केले जात आहे.

Comments