*दिवाळीच्या प्रकाश पर्वावर "सूर तेच छेडीता दिवाळी पहाट" कार्यक्रमाचे आयोजन**भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचा स्तुत्य उपक्रम*

*दिवाळीच्या प्रकाश पर्वावर "सूर तेच छेडीता दिवाळी पहाट" कार्यक्रमाचे आयोजन*

*भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचा स्तुत्य उपक्रम*

अतुल कोल्हे भद्रावती - 
               स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या प्रांगणात पहाटे पाच वाजता भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती तर्फे दीपोत्सवाचे आनंददायी पर्वावर " सूर तेच छेडीता... दिवाळी पहाट " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती नीलिमाताई  शिंदे ,  प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुषमाताई शिंदे , डॉ. सौ प्रियाताई शिंदे , डॉक्टर श्वेता शिंदे, प्रा.  डॉ. कार्तिक शिंदे, , श्री धनराज अस्वले, प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे, प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके शेखर सिंग  यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्याकडे दिवाळी हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो तो सण सर्वांसोबत साजरा व्हावा तसेच भद्रावती व परिसरातील  नवोदित कलाकारांना गायनाची संधी मिळावी या संकल्पनेतून डॉ. विवेक शिंदे यांनी भल्या पहाटे "सुर तेच छेडीता.... दिवाळी पहाट" या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती नीलिमाताई शिंदे,  श्रीमती सुषमाताई शिंदे, प्राध्यापक सौ. उज्वला वानखेडे यांनी दिलीप प्रज्वलन करून सुरुवात केली.

याप्रसंगी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना डॉ विवेक शिंदे यांनी  हा कार्यक्रम भद्रावतीच्या इतिहासात दिवाळी निमित्त भल्या पहाटे घेण्याचे तृतीय वर्ष असून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही देत उपस्थित सर्व नवोदित गायक कलाकारांचे आभार व्यक्त करण्यात आले. 

यावेळी सदर कलाकारांनी सुमधुर निवडक मराठी - हिंदी गीतांची श्रवणीय महफिल् सादर करण्यात आली यामध्ये गायक प्राध्यापक विवेक सरपटवार, गायिका सौ. वैदेही सरपटवार, आशुतोष सरपटवार, तबलावादक, लोभेश पिल्लेवार, गिटार वादक सुरेश तामगाडगे, गायक मनोज कृष्णन, प्रवीण बंड, दानिश शेख, बंडू कन्नाके, अंकुश भोयर, प्रांजली बिस्वास, दिनेश पेटकर, एम. कृष्णा, रवी पाठक, प्रकाश पिंपळकर, गौतम भगत, अनन्या मानके, तृप्ती राजुरकर प्रज्ञा बोरकर अंकुश भोयर, प्रा. डॉ. राजेश हजारे यांनी गीत सादर केले.

याप्रसंगी सर्व उपस्थित गायकांचे सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन  सत्कार भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे, सचिव प्राध्यापक डॉक्टर कार्तिक शिंदे, श्रीमती नीलिमाताई शिंदे व  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस.  लडके सर यांच्या हस्ते करण्यात आले.

हा कार्यक्रम भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे, सचिव डॉक्टर कार्तिक शिंदे,  डॉक्टर डॉक्टर एल. एस. लडके, प्राध्यापक धनराज अस्वले, श्री बंग साहेब, दिलीप शिंदे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाकरिता भद्रावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत सर्व शाळा व महाविद्यालय चे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक डॉक्टर सुधीर मोते व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ कार्तिक शिंदे  यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राध्यापक डॉक्टर सुधीर मोते, प्राध्यापक डॉक्टर राजेश हजारे, प्राध्यापक डॉक्टर नथू वाढवे, प्राध्यापक डॉक्टर अजय दहेगावकर, प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र हरणे, प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र बेदरे, प्रा डॉ शशिकांत सीत्रे , प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक संदीप प्रधान, प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कुमार नासरे, श्री अजय श्री किशोर भोयर, श्री भावरकर, श्री मानकर, श्री तेलंग व श्री आखतकर यांनी अथक परिश्रम केले.

Comments