नगर परिषद भद्रावती तर्फे भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न**सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती शहर करण्यास सहकार्य करावे : मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे आवाहन*
*सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती शहर करण्यास सहकार्य करावे : मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांचे आवाहन*
अतुल कोल्हे भद्रावती :
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून 'स्वच्छता ही सेवा २०२४' या अभियान अंतर्गत स्थानिक नगरपालिका अंतर्गत दि.१४ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर पर्यंत पंधरवाडा राबविण्यात आला.आणि
२ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती करण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी केले.
दरम्यान या पंधरवाड्यात स्वच्छ भारत, स्वच्छ संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात आले. नगर परिषदेने शैक्षणिक
संस्था, शाळा, महाविदयालयामध्ये स्वच्छ भारत अभियानाची जागरूकता पसरविण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा संकुल येथे करण्यात आले. या स्पर्धेत एकुण १९ शाळांनी सहभाग नोंदविला असुन वर्ग ८ वी ते १० वी अ गट, वर्ग ५ वी ते ७ वी ब गट, वर्ग १ ला ते ४ था क गट या तिन गट निहाय चित्रकला स्पर्धेत एकूण ४०० विदयार्थ्यांनी भाग घेतला.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी, ठाणेदार बिपीन इंगळे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, यांचे उपस्थितीत महात्मा गांधी व लाल बहादुर शास्वी यांचे जयंतीचा कार्यक्रम घेवुन चित्रकला स्पर्धेला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर यांनी केले.
या चित्रकला स्पर्धेला यशस्वी करण्याकरीता नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment