धोबी समाज संघटनेच्या भद्रावती तालुका अध्यक्षपदी किशोर भोस्कर यांची निवड*

*धोबी समाज संघटनेच्या भद्रावती तालुका अध्यक्षपदी किशोर भोस्कर यांची निवड*

अतुल कोल्हे भद्रावती :-
              भद्रावती तालुका धोबी समाज संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी किशोर भोस्कर यांची तर संघटनेच्या सचीवपदी श्रीनिवास नीलांजले यांची निवड करण्यात आली. सदर संघटनेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष- किशोर भोसकर, सचिव- श्रीनिवास नीलांजले, उपाध्यक्ष- सुखदेव पत्रकार, सहसचिव राजू आंबीलकर, कोषाध्यक्ष- संदीप चटपकार, सहकोषाध्यक्ष- बंडू भोस्कर,  कार्याध्यक्ष- उज्वल किनेकर व धीरज किनेकर, संयोजक -कवडू नाईक व शामराव नक्षीने, आयोजक -मधुकर क्षीरसागर,आण्याजी सोनुलकर,शंकर क्षिरसागर, मार्गदर्शक-अमोल ठाकरे,वासुदेव बावणे, अनिल बारसागडे, प्रकाश पिंपळकर. याशिवाय महिला प्रमुख म्हणून नीताताई आंबीलकर, वंदना किनेकर व वंदना मूलकुरवार यांची निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments