सर्वे करूनही गावाला वगळल्याने शेतकरी नाराज, शेतकरी नेते राजू चिकटे आणि किशोर डुकरे शेतकऱ्यांच्या मदतीला धावले.


सर्वे करूनही गावाला वगळल्याने शेतकरी नाराज, शेतकरी नेते राजू चिकटे आणि किशोर डुकरे शेतकऱ्यांच्या मदतीला धावले.

वरोरा 
चेतन लुतडे 

वरोरा तालुक्यातील मागील वर्षी सन २०२३- २०२४ ह्या हंगामात चना कापणीचे वेळेवर मोठ्या प्रमाणात गारपीठ झाल्यामुळे चना ह्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्या संदर्भात तलाठी श्री. तुरारे पटवारी तसेच कृषी सेवक सौ. माधुरी राजुरकर यांना नुकसानी बाबतची माहिती दिली असता त्यांनी गिरोला-पांजरेपार येथे येऊन पिकांची पाहानी केली. तेव्हा त्यांना चना ह्या पिकांचे नुकसान झालेले आढळून आले. तसेच स्थळ चौकशीचे वेळेस गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री. रुपेश महादेव मोडक, सौ. रोशनी चेतन काकडे, सौ. गंगूबाई घनश्याम मोडक तसेच गावातील पोलिस पाटील मनिषा बलकी व बऱ्याच पैकी गावकरी व शेतकरी उपस्थित होते, तरी मात्र गावाची नाव वगळण्यात आलेली आहे.<br>परंतु गारपिटीमुळे चना ह्या पिकाचे नुकसान होऊन सुद्धा आमचा गाव नुकसान यादीतमध्ये समाविष्ट झालेला नाही. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा. असा विनंती अर्ज रुपेश मोडक यांनी तहसील कार्यालयातील तहसीलदारांना सादर केला आहे. यावेळी शेतकरी नेते राजूभाऊ चिकटे व प्रभावित शेतकरी तहसील दालनात निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

Comments