अतुल कोल्हे भद्रावती :-
एका 42 वर्षीय युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तीन रोज गुरुवारला रात्रो साडेनऊ वाजता शहरातील भोजवार्ड येथे घडली. आशिष विठ्ठल झुरमुरे, वय 42 वर्षे, राहणार भोजवार्ड, भद्रावती असे मृतक युवकाचे नाव आहे.सदर युवक हा आपल्या आजी सोबत भोजवार्ड येथे राहत होता. घटनेच्या दिवशी तो बेडरूम मध्ये गेला. बराच वेळ बाहेर आला नसल्याने आजीने दार ढकलुन पाहिले असता तो पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचा आढळून आला. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
Comments
Post a Comment