**गांधी जयंतीच्या दिवशी छोटू भाईंचे विरुगिरी आंदोलन : पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न*

**गांधी जयंतीच्या दिवशी छोटू भाईंचे विरुगिरी आंदोलन : पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न**

*प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांसाठी यशस्वी आंदोलन, प्रशासनांनी घेतली तात्काळ दखल*
फक्त बातमी 

*वरोरा:  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, वरोरा येथील शेख जैरुद्दीन उर्फ छोटू भाई यांनी गांधी जयंतीच्या दिवशी धाडसी आंदोलन केले. 
छोटू भाईंनी पाण्याच्या टाकीवर चढून प्रलंबित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यामुळे प्रशासनाला जागे होऊन त्यांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले गेले. ५ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून प्रशासनाकडे या प्रश्नांचा उल्लेख करण्यात आला होता, परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने छोटू भाईंनी पुन्हा एक धाडसी पाऊल उचलले.

छोटू भाईंच्या या धाडसी कृतीमुळे प्रशासनाला तातडीने हालचाली कराव्या लागल्या. प्रशासनाने आंदोलनानंतर तात्काळ चर्चा बैठक
 ९ ऑक्टोबर रोजी आयोजित केली, ज्यामध्ये प्रलंबित समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि पुनर्वसन गावातील नागरिकांनी पायाभूत सुविधांचा अभाव, रस्त्यांच्या कोळसा खान व पावर प्लांट मधील समस्या.वीज आणि पाण्याच्या समस्या, तसेच अवैध उत्खननामुळे झालेल्या नुकसानावर तीव्र आक्रोश व्यक्त केला.

शेतकऱ्यांचा आरोप होता की अवैध उत्खननामुळे त्यांच्या पिकांवर आणि भूमिगत जलस्तरावर मोठा परिणाम झाला आहे. छोटू भाईंनी या संदर्भात तातडीने कारवाईची मागणी करत प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर कठोर शब्दात टीका केली.


सहकाऱ्यांचा अनोखा विरोध आणि प्रशासनावर दबाव*
छोटू भाईंच्या आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी.मुंडण आंदोलन केले, 71 नागरिकांनी मुंडन केले
.ज्यामुळे प्रशासनावर आणखी दबाव निर्माण झाला. यामुळे प्रशासनाने समस्यांवर उपाययोजना करण्याचे ठरवले आणि लवकरच त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

डोंगरगाव रेल्वे परिसरात अवैध उत्खननामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर आणि भूमिगत जलस्तरावर मोठा परिणाम झाला आहे. छोटू भाई यांनी यावर कठोर कारवाईची मागणी केली असून, तहसीलदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांवर १.५१ कोटी रुपयांची दंडात्मक नोटीस जारी केली होती. तथापि, नोटीसीनंतर आठवड्याहून अधिक काळ उलटला तरी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत माहिती दिलेली नाही. आचार संहितेच्या अंमलबजावणीनंतर ही कारवाई थांबेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

छोटू भाईंच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे वरोरा तालुक्यातील लोकांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे. त्यांची धाडसी कृती ही प्रकल्पग्रस्तांसाठी प्रेरणादायी ठरली असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांकडे आता योग्य लक्ष दिले जाणार आहे.

 सदर आंदोलना छोटू भाई सोबत 7.तास पाण्याच्या टाकीवर आंदोलन करणारे शेषराव भोयर. दिलीप बाबू नेताम. विनोद कुंभारे रमेश मसराम नरेश मरसकोल्हे संजय कुंभार धर्मराज ठाकरे विनोद कार्डसपे अभय मडावी प्रमोद सोनटक्के विजय टेकाम रावण किनके प्रशांत कुवे तुळशीदास किन्नके. राहुल भोयर सतीश मेश्राम विकास भोयर नरेश कोळपे
सौ शुभांगी कुंभारे. सौ.सिधुकला सेडम. सौ किरण टेकाम. 
सौ. मद लगोटे सो अंजू तोडासे यांच्यासह इतर सुद्ध

व खाली शेकडो नागरिकांसोबत.आंदोलनाला  बसून मुंडल करणारा.
कुंगरे.जी सरपंच श्रीहरी मेश्राम सह 71 आंदोलनकर्त्यांनी मुंडन केले यावेळी उपस्थित शब्बीर शेख मोहसीन पठाण राजू बनसोड फारुक शहा जावेद अन्सारी सचिन ढवस मुन्ना पाठक आकाश पाठक उमेश गेडाम संतोष मेश्राम कैफ शेख गुलाब धोबे बबन शिरसागर सह अनेक पुरुष व.महिला सहकारी उपस्थित होते
 सदर आंदोलनाला समर्थन देण्याकरिता माजी नगराध्यक्ष गजाननराव मेश्राम माजी नगराध्यक्ष विलास भाऊ टिपले डॉक्टर सेलचे अध्यक्ष हेमंत खापणे माजी नगरसेवक प्रमोद काळे यांच्यासह इतर सुद्धा पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून आंदोलनाला 
 समर्थन दिले
 सर्वच सहकार्याने प्रशासनाला सर्व बाबी समजून उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली छोटूभाई यांच्या उपस्थितीत 
 तातडीची बैठक समस्या करणार करिता दिनांक 9.10.2024. 4.00वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे घेण्यात येणार आहे तरी या संबंधित कुठल्याही समस्या असल्यास त्यांनी तक्रार माहिती.छोटूभाई यांच्याकडे सर्वांच्या सहकार्याने सदर आंदोलन यशस्वी झाले
.

Comments