_चला बदल घडवूया चा आध्यात्मिक उपक्रम_
फक्त बातमी
चेतन लुतडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मृती पर मौन श्रद्धांजली निमित्य श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भव्य गुरुदेव भक्त व महिला जागर मेळाव्याचे आयोजन वरोरा येथील शगुन मंगल कार्यालयात रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आलेले आहे.
वरोरा भद्रावती क्षेत्रातील गुरुदेव भक्त व महिला यांच्या करिता डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या संकल्पनेतून *चला बदल घडवूया* उपक्रमांतर्गत भव्य जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी अमरावती गुरुकुंज मोझरी येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. काळे महाराज यांचे मार्गदर्शन गुरुदेव भक्तांना लाभणार आहे .तसेच विवेकवादी विचारवंत तथा प्रबोधनकार श्री. दिलीप सोळंके हे 'महिला सक्षमीकरणात विवेकाचा वापर' या विषयावर उपस्थित बंधू भगिनींसोबत संवाद साधणार आहेत . तरी या अध्यात्मिक पर्वणी चा लाभ वरोरा -भद्रावती क्षेत्रातील संपूर्ण गुरुदेव भक्त तथा महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहन श्री.गुरुदेव सेवा मंडळ वरोरा ,भद्रावती यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.
Comments
Post a Comment