*छावा ग्रुप वरोरा तर्फे गरबा व दांडिया महोत्सवाचे आयोजन*पत्रकारांच्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे उद्घाटन.

*छावा ग्रुप वरोरा तर्फे गरबा व दांडिया महोत्सवाचे आयोजन*

पत्रकारांच्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे उद्घाटन.

वरोरा - छावा ग्रुप वरोरा तर्फे आयोजित गरबा व दांडिया महोत्सवाचा उद्घाटन सोहळा वरोरा येथील आनंदवन चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटन समारंभात दैनिक साह्याद्रीचे संपादक आशिष घुमे, व्हाईस ऑफ मिडियाचे तालुका अध्यक्ष पत्रकार चेतन लुतडे, तरुण भारत वृत्तपत्राचे श्याम ठेंगडी, नवजीवन जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, सकाळ वृत्तपत्राचे बालकदास मोटघरे, लोकशाही वार्ता वृत्तपत्राचे सारथी ठाकूर तसेच छावा ग्रुपचे मार्गदर्शक सुधाकर कुंकुले, अध्यक्ष आकाश लिगाडे, उपाध्यक्ष निहाल मत्ते, सचिव समिर देठे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. पत्रकार चेतन लुतडे यांनी नवरात्रीचे महत्त्व विशद करत, गरबा याचा अर्थ 'गर्भ' या गहरा या शब्दापासून आला आहे. सुरुवातीला देवी जवळ सच्छिंद्र घट मध्ये दिवा लावत असे. गरबाचा अर्थ गर्भ, किंवा आंतरिक ऊर्जा , शक्ती देवीच्या या ऊर्जेला आराधना किंवा साधना करून  प्रसन्न करण्याचे गरबा हे प्रभावी माध्यम आहे. गरबा नृत्यातील गोलाकार चक्र ब्रम्हांडातील निरंतर चालत असलेले जीवन -मृत्यूचे प्रतीक आहे. नऊ दिवस साजरा होत असलेला नवरात्र सन मोठ्या उत्साहात देशात साजरा केला जातो. याप्रसंगी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकाराच्या संघटनेच्यावतीने छावा ग्रुपचे अध्यक्ष आकाश लिगाडे व  सुधाकर कुंकुले व सर्व सदस्यांना नवरात्र निमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी आशिष घुमे यांनी छावा ग्रुपच्या कार्याची प्रशंसा करताना ग्रुप स्थापनेपासूनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 

आधुनिक संत बाबा आमटेंच्या विचारांनी प्रेरित होऊन युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानानुसार 'शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा' या धर्तीवर विविध सामाजिक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. आकाश लिगाडे यांच्या कार्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश लिगाडे यांनी केले, तर आभार  निहाल  मत्ते यांनी मानले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलश गेडाम, गुड्डु गेडाम, सागर गायकवाड, अनिमेश रेड्डी, अनुप पाटील, नयन कामडी, बादल रौतेल , सतीश सलामे, वंश कुरेकर, लकी जामगड, अनिरुद्ध हजारे, सौरभ राऊत, निलेश अंबाडे, बंटी चौधरी, गौरव गजभे, मोहित किन्नाके, क्रिष्णा हरणे, तेजस राऊत, शुभम मेश्राम,आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. हा महोत्सव ९ दिवस चालणार असून, विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत.




Comments