राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी महाविकास आघाडी ची बैठक संपन्न

*राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी  महाविकास आघाडी ची बैठक संपन्न*  

फक्त बातमी 
चेतन लुतडे 

 दिनांक 13ऑक्टोबर रोजी राजुरा विधानसभा आमदार तथा राष्ट्रीय काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष भाऊ धोटे यांच्या  अध्यक्षतेखाली  राजुरा विधानसभा येथील महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्रजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस चे अरुणजी निमजे तसेच काँग्रेस पक्षाचे अरुणजी धोटे हे प्रमुख स्थानी होते. 
यावेळी तिन्ही पक्षाच्या वतीने येणारी राजुरा विधानसभा  ही सर्वांनी मिळून ताकतीने लढवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आनू असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी रवींद्र शिंदे यांचा आज वाढदिवस असल्याने तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांनी केक व पुष्पगुच्छ  देऊन  त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना-उबाठा पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकारी यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करत विजयश्री खेचून आणायसाठी योग्य तो सन्मान ठेऊन आपसामध्ये चांगल समन्वय ठेऊन  मतदारंमध्ये महाविकास आघाडी ची भूमिका मांडण्या संदर्भात सूचना केल्या व पुढे तिन्ही पक्षाच्या समन्वय समिती च्या माध्यमातून निवडूक रणनीती ठरवून सामोरे जाण्याची भूमिका स्पष्ट केली.


Comments