*गोंड धर्मीया आदिवासी संघटनेचा १४ ला तहसीलवर मोर्चा**सात वर्षीय अल्पवयीन बालीकेचा विनयभंग प्रकरण*

*गोंड धर्मीया आदिवासी संघटनेचा १४ ला तहसीलवर मोर्चा*

*सात वर्षीय अल्पवयीन बालीकेचा विनयभंग प्रकरण*

अतुल कोल्हे भद्रावती - 
              शहरातील आदिवासी समाजाच्या सात वर्षीय बालिकेला मारहाण करून तिचा विनयभंग केला या प्रकरणी अटकेत असलेल्या ३७ वर्ष  नराधमावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक १४ ऑक्टोंबरला गोंडधर्मी आदिवासी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणारअसल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रमेश मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेते मंडळी , लोकप्रतिनिधी , मंत्री हे निव्वळ आदिवासी समाजाच्या पाठीमागे आहोत असे नेहमी म्हणत असतात मात्र आदिवासी समाजाच्या बालीकेवर , स्त्रियांवर असे महिला अत्याचाराचे प्रकार घडले तर कोणीही समोर येऊन आवाज उठवत नाही दिनांक ५ ऑक्टोंबरला सात वर्षीय बालिकेला मारहाण करून तिचा विनयभंग केला या घटनेची साधी विचारपूस सुद्धा या प्रतिनिधी करून करण्यात आली नाहि. निलेश राजेश्वर चटपल्लीवार या ३७ वर्षीय आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक १४ ला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी गोंड धर्मीय संघटनेचे अध्यक्ष रमेश मेश्राम, अँड. प्रमोद गेडाम, संदीप कुंमर , पिंटू मरसकोल्हे सह महिला व पुरुष उपस्थित होते.

Comments